-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची शैली अनेकांना आवडते. कोणतीही आकडेवारी तोंडपाठ असणाऱ्या नितीन गडकरींचं विरोधकही कौतुक करत असतात. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. यानंतर तेदेखील गडकरींच्या कामाने भारावलेले दिसले.
-
नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर अनुभव रोहित पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नागज- सांगोला महामार्ग) इथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करुन दिला जावा आणि संबंधित रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ग्राह्य केला जावा, अशी विनंती रोहित पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिल्लीत भेट घेऊन केली. यावेळी गडकरी यांनी या कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश देत लवकरच हे दोन्ही काम होतील अशी हमी दिली.
-
त्याचबरोबर कवठेमहांकाळ नगरपंचायतीबाबत माहिती घेऊन तिथे मिळालेल्या यशाबद्दल नितीन गडकरी यांनी आपले अभिनंदन केल्याचेही रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.
-
नितीन गडकरी यांनी यावेळी रोहित पाटील यांना काम पूर्ण होईल याचं आश्वासन दिलं. दरम्यान नितीन गडकरींच्या कामामुळे भारावलेल्या रोहित पाटील यांनी “दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे” ह्या वाक्याची प्रचिती आली आणि रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समज” हे वाक्य धीराचे होते, असं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
-
रोहित पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली. तासगाव बाह्यवळण रस्ता हा प्रस्तावित असून काही काम अपूर्ण राहिले आहे. स्व. आबा असताना ह्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा मानस त्यांचा होता. ह्या रस्त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना व नवीन तरुणांना नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी संधी उपलब्ध या रस्त्यामुळे होऊ शकते आणि शहरातील दळणवळण साठी अत्यंत फायदेशीर होऊ शकतो हे पटवून दिले. त्यामुळे सदर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ग्राह्य केला जावा अशी विनंती त्यांना केली”.
-
नक्कीच हा बाह्यवळण रस्ता तासगावच्या विकासासाठी नवी नांदी असेल हा विश्वास मला आहे. त्याचबरोबर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नगज- सांगोला महामार्ग) येथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करून दिला जावा अशी विनंती केली असल्याचंही रोहित पाटील यांनी सांगितलं.
-
सदर दोन्ही कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश दिले असून लवकरच हे दोन्ही काम होतील अशी हमी दिली अशी माहिती रोहित पाटील यांनी दिली आहे.
-
त्याचबरोबर नितीन गडकरी यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायती बाबत माहिती घेऊन अभिनंदन केले असल्याचंही ते म्हणाले.
-
कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवून दिली होती.
-
रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागा जिंकल्या होत्या.
-
निकालाच्या दिवशी माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले होते की, “आबांच्या आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्याने आम्हाला सत्तेत बसवलं आहे. आम्हा सर्वांना आबांची आठवण येत आहे. वडील ऐवजी चुकून बाप असा उल्लेख झाला होता. त्याच भाषणाचा धागा पकडत बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं होतं. आबांनी तसंच सुमनताईंच्या नेतृत्वात केलेलं काम लोकांनी पाहिलं असून त्यातूनच लोकांनी हा आशिर्वाद दिला आहे”.
-
“आम्ही लोकांसमोर विकासकामं घेऊन उतरलो होतो. लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी समजून घेत होतो. लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढला आणि त्यामुळेच हा विजय झाला,” असं रोहित पाटील म्हणाले होते.
![Chhaava Box Office Collection Day 1](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Chhaava-Box-Office-Collection-Day-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Chhaava : ‘छावा’ची ग्रँड ओपनिंग! विकी कौशलच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी