-
महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्वीट्समुळे चर्चेत असतात.
-
आनंद महिंद्रा यांनी यावेळी एक ट्विट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना टॅग केलं आहे.
-
यामध्ये त्यांनी इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटीकडून रस्त्यावर लावण्यात आलेल्या पंख्यांचा म्हणजेच विंड टर्बाइनचा ट्वीट केला आहे.
-
यामध्ये पवनचक्कीप्रमाणे पंख्यांच्या आधारे वीजनिमिर्ती केली जात आहे. आनंद महिंद्रा यांनी भारतातील वाहतूक पाहता आपण पवन ऊर्जेमध्ये जागतिक शक्ती बनू शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे. आनंद महिंद्रा यांनी एरिक सोलहीम यांच्या ट्वीटला रिट्वीट करत हा प्रश्न नितीन गडकरींना विचारला आहे.
-
एरिक सोलहीम ग्रीन बेल्ट अॅण्ड रोड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या ट्वीटला आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरींना आपण हे आपल्या रस्त्यांवर आणि हायवेवर लावू शकतो का ? अशी विचारणा केली आहे.
-
या तंत्रज्ञानात रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या हवेच्या आधारे हे पंखे फिरतात आणि त्यातून वीजनिर्मिती होते. इस्तंबूलमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला असून जगभरातून याचं कौतुक होत आहे. (फोटोः डेवेसीटेक)
-
या विंड टर्बाइनचं नाव ENLIL आहे. हवेच्या आधारे ते फिरतात. शेजारुन जाणाऱ्या वाहनांमुळे येणारी हवा पंखे फिरण्यास मदत करतात. याशिवाय वरती सोलार पॅनेल्सदेखील लावले आहेत. ज्या सौरऊर्जेच्या आधारे वीजनिर्मिती करतात. याचा अर्थ एकच यंत्र दोन वेगवेगळ्या पद्दतीने वीजनिर्मिती करतं. (फोटोः डेवेसीटेक)
-
इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि डेवीसीटेक या कंपनीने मिळून हे तंत्र निर्माण केलं आहे. (फोटोः डेवेसीटेक)
-
आपल्या शेजारुन एखादं वाहन जातं तेव्हा वेगाने येणारी हवाही तुम्हाला जाणवली असेल. याच हवेचा फायदा यामध्ये घेतला जातो. (फोटोः डेवेसीटेक)
-
जर हे पंखे दिवसभर सुरु राहिले तर एक किलोवॉट वीज तयार करतात. आणि जर सोलार पॅनेलमधून निर्माण होणारी वीजही जोडली तर ENLIL दिवसभर दोन बंगल्यांना पुरेल इतकी वीजनिर्मिती करतं. (फोटोः डेवेसीटेक)
-
हे पंखे २० वर्ष टिकतील अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. याचं डिझाईनच आकर्षणाचं केंद्र आहे. अत्यंत कमी जागेत हे यंत्र लावलं जाऊ शकतं. किंवा वेगाने हवा असणाऱ्या इमारत किंवा इतर ठिकाणीही लावलं जाऊ शकतं. (फोटोः डेवेसीटेक)
-
ENLIL फक्त वीजनिर्मिती करत नाही. याचे पंखे फिरताना आजुबाजूचं तापमान, हवेतील आद्रता, कार्बन फूटप्रिंट आणि इतर गोष्टींचाही रेकॉर्ड ठेवतात. यातून मिळणारी प्रत्येक माहिती स्थानिक प्रशासन आणि पर्यावरण वैज्ञानिकांसाठी फार मोलाची ठरत आहे. (फोटोः डेवेसीटेक)
-
उद्योगपती करेम डेवेसी यांच्या डोक्यात ही कल्पना सर्वात प्रथम आली होती. (फोटोः डेवेसीटेक)

सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात