-
गुढी पाडव्याला झालेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यावर उत्तर देण्यासाठी आज राज ठाकरेंनी ठाण्यात ‘उत्तर’ सभा घेतली.
-
या सभेमध्ये राज ठाकरेंनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
-
शरद पवारांवर यावेळी बोलताना अजित पवारांनी जातीपातीच्या राजकारणावरून टीका केली. “मला ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात गेलो. शरद पवारांना फक्त ईडीची नोटीस येतेय अशी चाहूल लागली होती. त्यावरून केवढं नाटक केलं”, असं राज ठाकरे म्हणाले.शरद पवारांवर यावेळी बोलताना अजित पवारांनी जातीपातीच्या राजकारणावरून टीका केली. “मला ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात गेलो. शरद पवारांना फक्त ईडीची नोटीस येतेय अशी चाहूल लागली होती. त्यावरून केवढं नाटक केलं”, असं राज ठाकरे म्हणाले.
-
शरद पवार म्हणतात, मी जातीयवाद भडकवतो. परदेशी पंतप्रधान चालणार नाही हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे पहिले होते. तो धागा पकडून शरद पवार ९९ ला काँग्रेसमधून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला आणि परत काँग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले. दोन महिन्यांत भूमिका बदलली.
-
शरद पवार भूमिका मांडताना म्हणतात हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. पण त्याआधी आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शरद पवार कधीही तुम्हाला छत्रपतींचं नाव घेताना दिसणार नाही. छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुसलमान मतं गेली तर काय करायचं? म्हणून ते छत्रपतींचं नाव घेत नाहीत.
-
शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात.
-
आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. शरद पवारांकडे अनेक घेण्यासारखे गुण आहेत. पण याचं काय करायचं?
-
सुप्रिया सुळेंच्या घरी रेड कशी पडली नाही? असा सवाल राज ठाकरेंनी केला. “सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? महाराष्ट्रात एक माणूस पोहोचवला की पवार साहेब मोदींची भेट घेतात, पुढचा माणूस सांगायला”, असं राज ठाकरे म्हणाले.
-
मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात बोललो होतो की शरद पवार खूश झाले म्हणजे भीती वाटायला लागते. आज शरद पवार संजय राऊतांवर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणारही नाही. यात अनेक काँग्रेसवाले गेलेत. मग उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते, ते आज लागलंय.
-
सुप्रिया सुळेंनी बोलायचं नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत.
-
जंत (जयंत) पाटील म्हणतात, “हे कधी उत्तर प्रदेशात गेले होते ज्यांना आता उत्तर प्रदेशचं कौतुक वाटतं”… माझं भाषण नीट ऐका. मी म्हटलं होतं ज्या बातम्या येतायत, त्यानुसार उत्तर प्रदेशचा विकास झाला असेल, तर त्याचा मला आनंद आहे.
-
जंत पाटलांना काहीही सांगा, चकित चंदू. एकदा मी सांगितलं बेहरामपाड्यात जाऊन बघा. गंभीर परिस्थिती आहे. तर म्हणे खरं की काय, मला काही माहितीच नाही. सतत चेहऱ्यावर आश्चर्य असतं.
-
जयंत पाटील म्हणतात, हा विझलेला पक्ष आहे. जंतराव, हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे. हे काय मला सांगतात. यांच्या मतदारसंघाबाहेर यांना कुणी हुंगून विचारत नाहीत.
-
भुजबळ म्हणाले, मीही मोदी-भाजपाविरोधात बोलत होते. पण मला झालेला त्रास मी सहन केला. त्यासाठी मी माझा मार्ग बदलला नाही. भुजबळ साहेब, तुमचा सीए, आणि तुमच्यासोबतचा एक माणूस यांनी केलेल्या गैरव्यवहारांमुळे तुम्हाला आत जावं लागलं. मोदींवर टीका केली म्हणून नाही जावं लागलं.
-
आमचे लाडके अजित पवार काय म्हणतायत बघा. त्यांचा आवडता शब्द आहे पठ्ठ्या. यांना काय म्हणे भोंगे आत्ताच दिसले का. याच्याआधी म्हणे झोपा काढत होतात का? अजित पवार, मी कधी कुठली गोष्ट बोललोय, हे मला नीट आठवतंय.
-
तो जो सकाळचा शपथविधी झाला, त्यानंतर शरद पवारांनी जो आवाज काढला, त्यानंतर अजित पवारांना तीन-चार महिने ऐकू येत नव्हतं काही. त्यानंतर त्यांना कूSSS असा आवाज ऐकू येत नव्हता. त्यामुळे मी जे काही बोललो, ते त्यांना कळलंच नाही.
-
लॉकडाऊनमध्ये अजित पवारांचा कान साफ झाला असणार. गुढी पाडव्याचा भोंगा ऐकू आला. मी चुकीचं काय बोललो. मशिदींवरच्या भोंग्यांचा आख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठंय?
-
यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो.
-
राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला.
-
सगळे गुढी पाडव्याच्या सभेनंतर एकदम चरफडले. एकच पालुपद लावलं की ईडीची नोटीस आली. परत आली तर परत जाईन. तुम्ही जाताय का? नुसत्या मालमत्ता जप्त केल्या तर पत्रकार परिषदेत शिव्या द्यायला लागले. काय तरी पत्रकार परिषदेतली भाषा. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ**, चु** शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतंय.
-
अशांसाठी (संजय राऊत) आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे ‘लवंडे’… म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचा. तसे हे लवंडे.. शिवसेनेकडून पडलं की तिकडे लवंडायचं, राष्ट्रवादीकडून पडलं की तिकडे लवंडायचं.
-
मला भोंग्यांचं राजकारण करायची गरज वाटत नाही. हा देश, महाराष्ट्र साफ झाला पाहिजे. इथले वयस्क, लहान मुलं, अभ्यास करणारी मुलं यांना या भोंग्यांचा त्रास होता कामा नये. त्याच्यासाठी उद्या काही केसेस अंगावर घ्याव्या लागल्या, तर माझ्यासकट आम्ही सगळे घेऊ. माझ्यावर शंभर-सव्वाशे आहेतच. अस्वलाच्या अंगावर अजून एक केस आला तरी काय फरक पडतो.
-
ज्या मुसलमानांना त्यांच्या प्रार्थना करायच्या आहेत त्या घरात करा. प्रत्येकानं आपला धर्म घरात ठेवावा, रस्त्यावर आणू नये. सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण समजू शकतो. पण ३६५ दिवस, २४ तास हे नाटक, लफडं महाराष्ट्रात चालणार नाही. एक गोष्ट सांगतो. आत्ता हनुमान चालीसा सांगितलीये. पण माझ्या भात्यातला पुढचा बाण अजून मी काढलेला नाही. तो काढायला मला लावू नका.
-
व्यासपीठावर येताना मला अग्निशम दलाचा बंब दिसला. पण मी इतकी काही आगा लावणार नाहीये.
-
मला तेव्हा मोदींच्या काही भूमिका नाही पटल्या. तेव्हा मी उघडपणे बोललो. आता हे म्हणतायत, मला ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलला. मला नाही गरज ट्रॅक बदलायची.
-
आजही माझं मोदींना सांगणं आहे. दोन मागण्या पूर्ण करा, खूप मोठे उपकार होतील. एक तर देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा.
-
मी चुकीचं काय बोललो. मशिदींवरच्या भोंग्यांचा आख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठंय? तुम्हाला जी आजान द्यायचीये, ती घरात द्या. शहरांचे रस्ते, फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे. आम्हाला का ऐकवताय? सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार!

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली