-
मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच, असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून लक्ष्य ठरलेल्या राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाडांचा चेहरा नागानं फणा काढावा असा असल्याचा टोला यावेळी लगावला. दरम्यान त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
-
राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांची नक्कल करत त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टोले लगावले. “यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. म्हणे राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला”, अशा प्रकारे एकेरी उल्लेख करत राज ठाकरेंनी टीका केली. (Express Photo: Deepak Joshi)
-
यावेळी राज ठाकरेंनी मुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची यादीच सादर केली. “२४ ऑगस्ट २००१ सीमीच्या सहा हस्तकाना अटक, २० डिसेंबर २००१ अबु हमजा, १६ मार्ट २०२० हिजबुल मुजाहिदिनी चार अतिरेक्यांना अटक, २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतलाल आयसीसचा मोरक्या, १६ मे २००३ मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, २६ जानेवारी २०१९ एका दहशतवाद्याला अटक”, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. (Express Photo: Deepak Joshi)
-
दरम्यान, यावरूनही राज ठाकरेंनी आव्हाडांवर निशाणा साधला. “आता तुम्ही म्हणाल, ‘वस्तरा नाही सापडला. आता कसा संन्यास घेणार? मी कुठे म्हटलो होतो की दहशतवादी सापडणार नाहीत?’ या अशा असंख्य घटना देशातल्या अनेक मदरशांमध्ये चाललेल्या आहेत. पाकिस्तानी अतिरेकी, शस्त्र सापडत आहेत. यात देशावर खरंच प्रेम करणारा मुसलमान भरडला जातोय”, असं राज ठाकरे म्हणाले. (Express Photo: Deepak Joshi)
-
“कालच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेखच नाही. तुम्ही जय भीमदेखील म्हणाला नाहीत. तुम्हाला अचानक काय झालं? शरद पवारांनी जातीयवाद वाढवला असं सांगता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला हे तुम्हाला माहिती नाही का? आईला सती न जाऊ देता शिवाजी महाराजांनी सगळं कर्मकांड तोडलं हे तुम्हाला माहिती नाही का? दुर्दैवाने तुम्ही पुरंदरेच वाचता. अफजलखानाचा कोथळा काढला त्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. पण त्याचसोबत अफजलखान खाली पडल्यानतंर महाराजांच्या आयुष्यात त्यांच्यावर एकदाच वार झाला. उजव्या खांद्यावर झालेला वार कोणी केला होता? अफजलखानाचा वकील कोण होता हे लपवून का ठेवता? अफजलखानाची सैनिक म्हणून जिजामातेंच्या आदेशाप्रमाणे कबर बांधली होती. पण ज्या माणसाने हल्ला केला होता त्याचं मुंडकं तलवारीवर घेत अख्ख्या गावभर फिरवलं त्याचं नाव तुम्ही का नाही सांगत? त्याचं नाव होता कृष्णा भास्कर कुलकर्णी…हे महाराष्ट्राला काही नाही सांगत? कोण जातीयवाद वाढवतंय?,” अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली.
-
“त्यानंतरच्या इतिहासात जिंकले तर पेशवे आणि हारले तर मराठा हा जातीय मतभेद कोणी निर्माण केला. पेशवे नव्हते असं तुम्ही कसं सांगू शकता. चित्रपट निघतात ते कोणावर निघतात. हे सगळं तुम्ही कधी सांगणार? ते उभं राहून हिडीस तिडीस बोलणं, टिंगळटवाळ्या करणं…तुम्हाला पेट्रोलचे, डिझेलचे, गॅसचे, भाजीपाल्याचे भाव दिसत नाहीत. त्यावर काहीच बोलणार नाही. एवढं भोंग्याबद्दल प्रेम आहे तर कालची सभा तुम्ही का घेतली? जिथे सभा घेतली तिथे एका बाजूला शाळा आणि शिवसमर्थ विद्यालय आहे. सुप्रीम कोर्टाचा नियम १०० मीटरच्या आजुबाजूला कर्णे लावू नये सांगितलं आहे. मग तुमच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही का?,” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.
-
“तुम्ही म्हणालात की दाढीच करत नाहीत तर वस्तरा कसा सापडेल…मुसलमान दाढीच करत नाही. तुमचा एक हाजी अराफत शेख नावाच मित्र होता हे विसरलात का..जो सध्या भाजपात आहे. तो मनसेच्या वाहतूक सेनेचा अध्यक्ष होता. त्याच्या बाजूला बसून तुम्ही अनेकवेळा जेवला होतात. तो दाढीच करायचा नाही हे विसरलात का?,” अशी विचारणा आव्हाडांनी केली.
-
“मी २००९ ला मुंब्र्यात गेलो, तेव्हापासूनचा इतिहास चाचपडून पाहा. फक्त दोनदा तेही बाहेरुन आलेले लोक ही अतिरेक्यांच्या रेकॉर्डवर आहेत. तेव्हा राज ठाकरेंनी बोलताना इतिहास जाणून घ्या. तुमच्यासमोर एक मुस्लिम बसला होता त्याचं उदाहरण दिलंत, त्याला दाढी नव्हती का? म्हणजे तुम्ही आता मुस्लिमांना प्रमाणपत्र देणार की देशद्रोही आहेत की देशप्रेमी…हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?,” असं आव्हाड म्हणाले.
-
“तुम्ही इतरांच्या नाकावर, चेहऱ्यावर, रंगावर जाता…म्हणजे तुमच्यात वर्णभेद, जातीवाद किती ठासून भरला आहे ते दिसत आहे. आम्ही आता जर तुम्ही ढोरपुटे झालात, तोंड कसं सुजलंय म्हटलं तर आवडेल तुम्हाला? राजकारणात वैयक्तिक टीका करणं पाप आहे. तुम्ही माझी अक्कल काढलीत..तुम्हा फार हुशार आहात. तुमच्या आजोबांनी प्रतापसिंह राजेवर यांच्यावर लिहिलेलं पुस्तक वाचा,” असा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिला.
-
“शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोध लावली. पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली,” याची आठवण आव्हाडांनी यावेळी करुन दिली. “शाहू महाराज तर वारसदार होते. दोघेही माझे आदर्श असल्याचं सांगत बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. त्यामुळे तिघांच्या रक्तात, शब्दात, क्रियेत शिवाजी महाराज होते. त्यामुळे या तिघांचं नाव घेणं शिवरायांच्या विचारांचं नाव घेण्यासारखं आहे,” असं आव्हाड म्हणाले.
-
तुम्हाला नेहमी फूट पाडण्याची सवय आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला. शिव्या आम्हीदेखील घालू शकतो फक्त ते आमच्या संस्कारात बसत नाही असंही ते म्हणाले. तुमचं भाषण तुम्हाला लखलाभ असो पण संत तुकाराम महाराजांनी उत्तर जशास तसं द्यायला हवं असं सांगितलं आहे.
-
तुमच्या भाषणावरचे ट्रोल जरा पहा. कौतुकापेक्षा हसत आहेत. तुम्हाला आत लोक जॉनी लिव्हर म्हणत आहेत याची लाज वाटते असं आव्हाड म्हणाले.
-
“पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील शरद पवारांचा फोटो समोर आला ना? उद्धव ठाकरेंच्या घरी गणपतीच्या पाया पडतानाचा फोटो समोर आला ना? तुम्ही म्हणजे इतिहासतज्ञ नाही. तुम्हाला अक्कल आहे असं नाही,” अशी टीका आव्हाडांनी केली.
-
सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत, अशी टीका राज यांनी केली. त्यावरही आव्हाडांनी उत्तर दिलं.
-
“सुळे घुसले की किती दुखतं ते विचारुन घ्या एकदा…हत्तीचे सुळे कसे घुसतात माहिती आहे ना? आम्हालाही बोलता येतं. पण राजकारणात हे खूप गांभीर्याने, प्रगल्भतेने घ्यायचं असतं. लोकांच्या सुखात भर पडेल, त्यांचे अश्रू पुसायचे असतात…हास्यविनोद करणारे जगात फार आहेत आणपही आहात,” असा टोला आव्हाडांनी लगावला.
-
“त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे की माझं तोडं काहीतरी नागाच्या फण्यासारखं दिसतं. अशा वैयक्तिक कोट्या तर कोणालाही करता येतात. ते मिमिक्री आर्टिस्टचं काम आहे. पण ज्याच्यात प्रगल्भता आहे, जो समोरच्यांचा आादर करतो जे महाराष्ट्राच्या मातीची शिकवण आहे, ज्याची समाजात प्रतिष्ठा आहे त्यांना मी अरे तुरे करत नाही,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
-
“माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का? तो भाग कोणता हे महाराष्ट्र ओळखतो,” असं प्रत्युत्तर आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं.
-
‘‘शरद पवार हे नेहमीच आपल्या भाषणात महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, असे म्हणतात. पण, त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत’’, अशी टीका राज यांनी केली आहे. त्यावरही आव्हाडांनी भाष्य केलं.
-
“शाहू, फुले, आंबेडकर हे छत्रपतींच्या विचारांचे वारसदार होते हे यांना कळलंच नाही, कारण यांनी बहुजन समाजाचा इतिहास वाचला नाही. हे नेहमी पुरंदरेंचा इतिहास वाचत गेले. ज्या पुरंदरेंनी जेम्स लेनला माहिती देऊन आमचया जिजाऊंची बदनामी केली ते यांचे आदर्श. इंग्लंडहून आलेला माणूस आमच्या जिजाऊंची बदानीमी करतो, चारित्र्यावर शिंतोडे उडवतो, चारित्र्यावर संशय व्यक्त करतो…पान नंबर ९३, परिच्छेद क्रमांक ४ यामध्ये काय लिहिलं आहे ते वाचा,” असा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे.
-
“त्यांनी पुस्तकात १२ लोकांचे आभार मानले असून त्यात एक नाव बाबासाहेब पुरंदरेंचं आहे. मग ही माहिती कोणी दिली? पुस्तक छापण्याआधी वाचण्यासाठी दिलं जातं ते बाबासाहेब पुरंदरेंना वाचता नाही आलं? आज ते मृत आहेत. त्यांचा मी सन्मान करतो, त्यांच्याबद्दल काही बोलायचं नव्हतं. मृत्यू झाल्यावर आपण विसरुन जातो, पण तुम्ही आठवण करुन देऊ नका. तुम्ही ज्यांची शिकवण घेऊन शिकलात त्यांची पुस्तकं वाचा,” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. (Express Photo: Deepak Joshi)
-
(File Photos)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी