-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दोन दिन दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर आहेत.
-
शरद पवार येणार असल्याने सकाळपासून कार्यकर्त्यांची स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु होती.
-
शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर नागपूर, अमरावतीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर जळगावमध्येही स्वागताची तयारी सुरु होती.
-
शुक्रवारी सकाळी शरद पवार जळगावमध्ये पोहोचले असता त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
-
शरद पवारांचं पक्षाच्या जिल्हा कार्यालयाजवळ जल्लोषात व जंगी स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.
-
ढोल-ताशांच्या गजर, गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण आणि जोरदार घोषणाबाजीत शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले.
-
शरद पवारांच्या स्वागतासाठी युवक काँग्रेसने चार क्विंटल फुलांचा हार तयार केला होता.
-
हा हार उचलण्यासाठी चक्क क्रेन बोलवण्यात आली होती.
-
शरद पवार पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली होती.
-
शरद पवार आल्यानंतर गाडीतून खाली उतरले आणि हार स्वीकारण्यासाठी पोहोचले होते.
-
यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलदेखील होते.
-
कार्यकर्त्यांची तुफान गर्दी असल्याने अंगरक्षक त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होते.
-
मात्र यावेळी अतीउत्साही कार्यकर्त्यांकडून शरद पवारांना धक्का लागल्याने सुरक्षारक्षकांनी त्यांना मागे ढकललं.
-
यानंतर शरद पवारही जास्त वेळ थांबले नाहीत आणि कारमध्ये बसून पुढच्या प्रवासाला निघून गेले.
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य