-
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज महाविकास आघाडीचा नवा घोटाळा बाहेर काढण्याआधीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला.
-
राऊत यांनी आपण लवकरच सोमय्या कुटुंबाचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून यामध्ये १०० कोटींहून अधिकचा अपहार झाल्याचा आरोप केलाय.
-
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांना सोमय्यांच्या आजच्या नियोजित पत्रकार परिषदेसंदर्भात विचारण्यात आलं असतं त्यांनी टॉयलेट घोटाळ्यासंदर्भात वक्तव्य केलं.
-
“आता मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा झालाय,” असं राऊत म्हणाले.
-
“कुठे कुठे पैसे खातात पाहा, विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत,” असं म्हणत राऊत यांनी सोमय्या कुटुंबावर निशाणा साधलाय.
-
“हे किरीट सोमय्याच आहेत. यासंदर्भातील सगळी कागदपत्रं सुपूर्द झालेली आहेत,” अशी माहितीही राऊत यांनी दिली.
-
“युवा प्रतिष्ठान नावाची जी काही संस्था चालवत होते हे आणि यांचं कुटुंब त्यांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा झाला आहे,” असा आरोप राऊत यांनी केलाय.
-
पुढे बोलताना राऊत यांनी, “या घोटाळ्याचे कागद पाहून मला हसायला आलं. खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले हे घोटाळे, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल,” असा दावा केलाय.
-
सोमय्यांच्या या टॉयलेट घोटाळ्यावरुन राऊतांनी फडणवीस आणि भाजपावरही निशाणा साधला.
-
“तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा. खरं म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी बोलायला हवं. त्यांना भ्रष्टाचाराविषयी फार कणव आहे,” असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला.
-
“राष्ट्रभक्ती उचंबळून जात असते भाजपाच्या लोकांची. कालपण मी पाहिलं शरद पवारांवर त्यांनी (फडणवीसांनी) ट्विटवर ट्विट केलेत,” अशा शब्दांमध्ये राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
-
“एखादं ट्विट त्यांनी (फडणवीसांनी) आयएनस विक्रांत घोटाळ्यावर करायला हवं. एखादं ट्विट त्यांनी या टॉयलेट घोटाळ्यावर करावं,” असंही राऊत म्हणाले.
-
पुढे बोलताना राऊतांनी, “जो आम्ही काढणार आहोत. १०० कोटींच्या वर आहे टॉयलेट घोटाळा,” असा टोला भाजपाला लगावला आहे.
-
सोमय्यांवर निशाणा साधत राऊत यांनी, “आता ते टॉयलेटमध्ये घाण करुन ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत. पुरावे कुठेत हे त्यांनाही माहितीय. अहवाल काय आहे हे ही माहितीय,” असा दावा केला.
-
“युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेला घोटाळा आहे. याला टॉयलेट घोटाळाच म्हणता येईल दुसरा कोणता शब्द मी वापरत नाही,” असं म्हटलं आहे.
-
“तुम्ही अशा कितीही प्रकारचे आमच्यावर हल्ले केले, फुसके बार सोडले तरी काही होणार नाही. आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं द्या,” अशी टीका राऊतांनी सोमय्यांवर केली.
-
“विक्रांतवर तुम्ही उत्तर देऊ शकला नाहीत. सत्र न्यायालयाने तुम्हाला काही प्रश्न विचारलेत. सत्र न्यायालय मुर्ख आहे का? ती सुद्धा न्यायव्यवस्थाच आहे ना. त्यांना सुद्धा न्यायव्यवस्थेमध्ये मानाचं स्थान आहे,” असंही राऊत म्हणाले.
-
“हुशार लोक आहेत ती (सत्र न्यायालयामधील). न्याय मागायला तिथं जावं लागतं. तुम्हाला जामीन नाकारताना सत्र न्यायालयाने तुमच्यावर बेईमानाची ठपका ठेवलाय,” असं राऊत यांनी म्हटलंय.
-
“पैसे गोळा केले तुम्ही, ते कुठे आहेत हे माहिती नाही आणि तुम्ही पुरावा काय मागताय. राजभवन सांगतंय तुमचं की पैसे जमा झाले नाहीत, अजून कसला पुरावा पाहिजे न्यायालयाला?”, असा प्रश्न राऊतांनी विचारला.
-
“बातमीच्या कात्रणावर गुन्हा दाखल झालेला नाही. १२ वर्ष तुम्ही पैसे हडप करुन बसला त्याच्यावर राजभवनाने जो कागद लिहून दिलाय आम्हाला त्यावर गुन्हा दाखल झालाय. लोकांची दिशाभूल करु नका,” असंही राऊत यांनी सोमय्यांवर टीका करताना म्हटलंय.
-
दुपारी सोमय्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
-
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या श्रीजी होम्स या कंपनीमध्ये २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपये मनी लाँड्रिंगद्वारे आले आहेत,” असा आरोप सोमय्यांनी केलाय.
-
“उद्धव ठाकरेंचा सरळ प्रश्न आहे की या कंपनीसोबत काय संबंध आहे?,” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.
-
यावरुनही राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सोमय्यांवर निशाणा साधलाय. “स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हे प्रकार सुरु आहेत,” असं राऊत म्हणालेत.
-
“कोर्टाने जरी अंतरिम जामीन दिला असला तरी हा दिलासा घोटाळ्याचा एक प्रकार आहे. पण भविष्यात या सगळ्यांना तुरुंगात जावे लागणार आहे,” असंही राऊत यांनी म्हटलंय.
-
“उच्च न्यायालयामध्ये जावून तुम्ही दिलासा घोटाळ्याचे लाभार्थी ठरलेला आहात म्हणून निर्दोषत्व संपत नाही. तुम्ही आरोपी आहात. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तुम्हाला तुरुंगात जावे लागणार आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
-
“आज सकाळी मी त्यांचा टॉयलेट घोटाळा काढून एक ट्रेलर दाखवला आहे,” असं राऊत भाजपाला इशारा देत म्हणालेत. तसेच सकाळी पत्रकरांशी बोलताना या टॉलेट घोटाळ्याचा दुर्गंध महाराष्ट्रभर पसरणार असून फडणवीसांना त्याचं स्पष्टीकरण द्यावं, असंही राऊत म्हणालेत.
-
“किरीट सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या निधीमध्ये घोटाळा केल्याचे कागद आताही देऊ शकतो,” असा दावा राऊत यांनी केलाय.
-
“उगाच नावं घेऊन कागद फडकावयचे आम्हाला मान्य नाही. त्याच्यासंदर्भात रितसर तक्रार दाखल होत आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
-
आता खरोखरच राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार सोमय्यांवर गुन्हा दाखल होणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. (सर्व फाइल फोटो)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख