-
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरू होती. भाजपानं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
-
दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या पाठिशी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद उभी राहिल्यामुळे दोघांमध्ये कांटे की टक्कर होणार असल्याचं भाकित वर्तवलं जात होतं. पण प्रत्यक्षात जयश्री जाधव यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा दणदणीत पराभव केला.
-
या निकालानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीमधील पक्षांनी चंद्रकांत पाटलांना आता हिमालयामध्ये कधी जाणार असा सवाल केलाय. “कोल्हापुरातून निवडणूक हरल्यास राजकारण सोडून हिमालयात जाईन”, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर केलं होतं, त्याच पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटलांवर टीका होताना दिसतेय.
-
कोल्हापूरमधील विजयानंतर पुणेकर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर चंद्रकांत पाटलांना हिमालयामध्ये पाठवण्यासाठी वर्गणीही गोळा केली. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे)
-
जयश्री जाधव यांच्या विजयानंतर कोल्हापूरमध्ये तर जंगी सेलिब्रेशन काँग्रसेच्या कार्यकर्त्यांनी केलंच पण पुण्यामध्येही या विजयाचं मोठं सेलिब्रेशन काँग्रेसकडून करण्यात आलं. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे)
-
पुण्यातील काँग्रेस कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी जयश्री जाधव यांच्या विजयानंतर जल्लोष साजरा केला. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे)
-
याच सेलिब्रेशनदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी, ‘चंपासाठी हिमालय निधी’ नावाने प्रतिकात्मक वर्गणी गोळा केली. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे)
-
काहींनी दहा रुपये तर काहींनी पाच रुपये या गल्ल्यामध्ये टाकत चंद्रकांत पाटलांवर अनोख्या पद्धतीने निशाणा साधत काँग्रेसच्या विजयाचं सेलिब्रेशन केलं. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे)
-
कोल्हापूर व्हाया कोथरु़ड व्हाया हिमालय असा मजकूर या निधी संकलनाच्या गल्ल्यावर लिहिण्यात आलेला. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे)
-
राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विटरवरुन पाटलांवर निशाणा साधलाय. आव्हाड यांनी ट्वीट केलेल्या मीममध्ये चंद्रकांत पाटील मांडी घालून आणि डोळे मिटून बसल्याचं दिसत आहे. तो फोटो मॉर्फ्ड करून त्याच्या पार्श्वभूमीवर हिमालयाचा फोटो लावण्यात आला आहे. सोबत बॉक्समध्ये ‘मी पोहोचलो रे हिमालयात’ असं वाक्य लिहिलं आहे. हे ट्वीट शेअर करताना जितेंद्र आव्हाडांनी “नको, परत या”, अशी खोचक टिप्पणी केली आहे.
-
चंद्रकांत पाटील यांचं हिमालयात जाण्यासंदर्भातील वक्तव्य आजच्या भाजपा उमेदवाराच्या पराभवानंतर कोल्हापूरसोबतच राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत असल्याचं दिसलं. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे)
-
निधी संकलनासोबतच कार्यकर्त्यांनी नाचूनही आनंद साजरा केल्याचं पहायला मिळालं. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे)
-
पुण्यामधील काँग्रेस कार्यालयाच्याबाहेर अनेक कार्यकर्ते विजयाच्या जल्लोषामध्ये नाचतानाही दिसले. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे)
-
खेंगरे
-
ढोल ताशांच्या तालावर काँग्रेस कर्यकर्ते कार्यालयाबाहेरच नाचताना दिसून आले. (फोटो सौजन्य – पवन खेंगरे)
-
आपल्या हिमालयात जाण्यासंदर्भातल्या विधानाची चर्चा सुरू असल्याचं पाहून कोल्हापूर निवडणुकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावर खुलासा केला आहे.
-
“आमचे नाना कदम लढले, तर तुमच्या तोंडाला फेस आला. मग मी लढलो तर काय होईल? मी असं म्हटलं होतं की मी लढलो आणि जिंकलो नाही तर मी हिमालयात जाईन. मी लढलोच नाही ना. नानाच लढले,” असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.
-
तसेच पुढे बोलताना, ” अक्षरश: फेस आला तुमच्या तोंडाला. इथे तर कमी मतांनी विजय आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Pahalgam Terror Attack Live Update: पाकिस्ताननं भारतासाठी हवाई हद्द बंद केली, पुढे काय? केंद्रीय मंत्री म्हणतात, “जर ही परिस्थिती वर्षभर राहिली…”