-
“मशिदींवरील भोंगे काढण्याची आणि हनुमान चालीसा पठण करण्याची मागणी ही राज्यामध्ये सामाजिक तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.” (सर्व फोटो-संग्रहीत)
-
“महाविकास आघाडी सरकार उलथून लावण्यासाठी हे प्रयत्न केले जात असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने भाजपा हे प्रयत्न करत आहे.”
-
“हिंदू समाजात देखील काही ओवेसी निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात फूट पाडण्याचे, दंगली घडवण्याचे, धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरू झालेले आहेत.”
-
“भाजपा त्यांचं काम हे ‘नवहिंदुत्ववादी एमआयएम’ आणि ‘नवहिंदू ओवेसींच्या’ माध्यमातून करुन घेत आहे.”
-
“भोंगे वाटप करुन मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवण्याचा त्यांचा डाव आहे, त्यांनी यासाठी कंत्राट दिलं आहे.”
-
“ते मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवतील. मग खरे ओवेसी (असदुद्दीन ओवेसी) या प्रकरणामध्ये (भोंगा प्रकरणात) पडतील आणि साऱ्याचं रुपांतर दंगलींमध्ये होईल.”
-
“दंगली झाल्यानंतर ते केंद्राकडे राजभवनाच्या माध्यमातून अहवाल पाठवतील आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतील.”
-
“देशभरातील दंगलीचा व्यापक कट आहे आणि जे दिल्लीत घडलं ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. परंतु यशस्वी होणार नाहीत.”
-
“महाराष्ट्राची जनता अत्यंत सावध आहे, जागरुक आहे, संयमी आहे आणि ज्ञानी आहे, एवढच मी सांगेन.”
-
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना अयोध्येच्या राम मंदिराच्या लढ्यामध्ये प्रत्यक्ष रणभूमीवर काम करत होती.”
-
“आमची काय राजकीय यात्रा नाही, आमची ही श्रद्धेची यात्रा आहे. राजकीय यात्रा असेल तर आम्ही तारीख ठरवतो आणि जाहीर करतो.”
-
भाजपा सध्या निराश झालेला पक्ष असून महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना आपल्या बाजूने करण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी होत आहेत.
डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल