-
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली.
-
या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासहित धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर यांच्यासहित अनेक नेते उपस्थित होते.
-
या बैठकीला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
-
जयंत पाटील यांनी यावेळी त्यांच्या मतदारसंघातील १ ते २८४ क्रमांकापर्यंत सर्व बुथ कमिटीच्या सदस्यांना, अध्यक्षांना पुकारून त्यांची शिरगणती करुन दाखवली. तसेच स्वतःच्या मतदारसंघातील कार्यकारिणीची माहिती करुन दिली.
-
सत्तेत गेल्यानंतर मागे वळून बघण्याची भूमिका नसते. पण मी सत्तेत असतानाही पुन्हा कार्यकर्त्यांच्या दारी जाण्याचा निर्णय घेतला म्हणून हा राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
-
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपा तसंच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
-
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील विरोधकांवर जोरदार टीका केली.
-
“आज इतिहास आणि धर्मांधतेचे प्रश्न उभे केले जात आहेत. त्यालाही आम्ही सडेतोड उत्तर देऊच. पण सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यावर जनतेचे लक्ष वळविणे गरजेचे असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
-
विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.
-
शिवछत्रपतींच्या इतिहासात बनवाबनवी करुन जेम्स लेनद्वारे महाराज आणि माँ जिजाऊंची बदनामी केली गेली हे ऐतिहासिक पुराव्यासहीत मिटकरी यांनी दाखवून दिले.
-
तसेच हनुमान चालिसा भोंग्यावर लावणाऱ्यांना स्वतःला तरी हनुमान चालीसा येते का? असा प्रश्न उपस्थित करुन मिटकरी यांनी हनुमान चालिसा व मारुती स्त्रोत्र म्हणून दाखविले. मिटकरी यांच्या भाषणाला उपस्थित कार्यकर्त्यांनी देखील उस्फुर्त प्रतिसाद दिला.
-
“बोलताना चेहऱ्यावर काही हावभाव नाहीत. जितेंद्र आव्हाडांना नागासारखा चेहरा म्हणाले. आम्ही नागवंशीय असल्याने नागासारखे चेहरे आहेत,” असं उत्तर यावेळी त्यांनी दिलं.
-
यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील जोरदार भाषण केले. महाराष्ट्रात सध्या भाजप रामदास पाध्येच्या भूमिकेत असून त्यांना जे म्हणायचे आहे, ते ‘अर्धवट राव’ या बाहुल्याच्या तोंडून बोलले जात असल्याची टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली.
-
धनंजय मुंडे म्हणाले, ”राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करीत आहेत. पूर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपाच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपाविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले”.
-
माणसं सत्तेत आल्यानंतर किती माजतात हे आपण मागच्या पाच वर्षात पाहिलं अशी टीका त्यांनी भाजपावर केली.
-
”कुठल्या तर कारणाने या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले. जयंत पाटील जलसंपदा मंत्री झाले आहेत.बीडला पाणी दिले तर इकडे ऊस पण तोडू आणि तिकडे ऊस पण पिकवू,” असे मुंडे म्हणाले.
-
जलसंपदा मंत्री म्हणून जयंत पाटील मराठवाड्यासाठी करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. आदरणीय पवार साहेबांचे मार्गदर्शन व पाटील साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात राष्ट्रवादी आगामी काळात राज्यातील क्रमांक एकचा पक्ष होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
-
धनंजय मुंडे यांनी या सभेत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक दिवस मुख्यमंत्री होणार असा विश्वासही व्यक्त केला. राष्ट्रवादीचे १०० आमदार निवडून आणण्याचं जयंत पाटील यांचं स्वप्न असून तेदेखील पूर्ण होणार असंही ते म्हणाले.
-
”तुम्हाला जात आठवते. कुणीही जातीचे राजकारण करीत नाही. आम्ही जातीयवादी राजकारण करता म्हणून सांगता, चार खासदार त्यांनी पाठवले. समतेचे राज्य पवार साहेबानी उभं केले आहे. छगन भुजबळ यांना, अमोल मिटकरी, मला अशा अनेक जणांना मोठी पदे दिली. तुम्हाला जणांची ना मनाची लाज वाटली पाहिजे,” अशा शब्दांत मुंडेंनी राज ठाकरेंना सुनावलं.
-
धनंजय मुंडे यांनी यावेळी जयंत पाटलांशी असलेले ऋणानुबंध अशा अनेक नव्या-जुन्या नात्यांना यानिमित्ताने उजाळा मिळाला असं यावेळी सांगितलं.
-
राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनीही यावेळी भाषण केलं.
-
राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्ष रवीकांत वरपेदेखील यावेळी हजर होते.
-
राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरदेखील यावेळी उपस्थित होत्या.
-
(Photos: Twitter)
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?