-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील “झुकेगा नहीं साला” म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या ९२ वर्षीय आजीबाईंची सहकुटुंब भेट घेतली.
-
यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे उपस्थित होते.
-
मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे या आजींची परळमधील दाभोळकर वाडीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली.
-
चंद्रभागा आजींना भेटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी “तुम्हीच आमच्या घरी यायचं का?” अशी विचारणा करत आजींचे हात हातात घेतले आणि संवाद केला.
-
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असताना मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमाला गैरहजर राहत आजींची भेट घेतली.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आजींच्या घरी आगमन होताच त्यांना ओवाळण्यात आलं.
-
यावेळी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना देखील ओवाळण्यात आलं.
-
घरात प्रवेश करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजींचे हात हातात घेऊन संवाद साधला, तर रश्मी ठाकरे यांनी चंद्रभागा आजींची गळाभेट घेतली.
-
स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेटीला आल्याने शिवसैनिक असलेल्या चंद्रभागा आजींचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
-
यावेळी आजींनी पुन्हा एकदा मुंबईत शिवसेनेशिवाय कोणीच येणार नाही असं म्हणत आम्ही तुमच्या सोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगितलं.
-
यावेळी आजींच्या घरी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी चंद्रभागा आजींसोबत एक कुौटुंबिक फोटो देखील काढला.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी