-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे.
-
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमसाठी दोन दिवस शिल्लक असताना होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय भूमिका घेतात याचीही उत्सुकता आहे.
-
राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे.
-
या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार आणि त्याचे काय पडसाद उमटू शकतात, याबाबत समाज माध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे.
-
राज ठाकरेंचं भाषण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे.
-
राज ठाकरेंच्या भाषणाचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या सभेसाठी हजारो श्रोते उपस्थित असतात.
-
राज ठाकरेंचं भाषण ऐकल्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण होते, असे अनेक श्रोते सांगतात.
-
त्यांच्या भाषणाची शैली, भाषेवरची पकड, स्पष्टवक्तेपणा, उत्तम वत्कृत्व यामुळे राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी लाखो नागरिक गर्दी करतात.
-
राज ठाकरेंच्या भाषणानंतरही अनेक दिवस त्याचीच चर्चा सुरु असते.
-
सोशल मीडियावरही राज ठाकरेंच्या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होत असतात.
-
राज ठाकरे त्यांच्या भाषणातून विरोधक, राजकारणी यांच्यावर निशाणा साधत असतात.
-
कधी थेट वार करत तर कधी शालजोड्यातून ते विरोधकांचा समाचार घेत असतात.
-
पण उस्फुर्त आणि अभ्यासपूर्ण भाषणाची तयारी राज ठाकरे कशी करतात?, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांची नुकतीच एका वाहिनीने मुलाखत घेतली.
-
या मुलाखतीदरम्यान ‘राज ठाकरे भाषणाची तयारी कशी करतात?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता.
-
यावर उत्तर देताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “राज ठाकरेंचं भाषण नेहमीच उस्फुर्त असतं. ते कधीच भाषण वाचून बोलत नाहीत. अभ्यासपूर्ण भाषणासाठी ते अवांतर वाचन करतात.”
-
पुढे त्या म्हणाल्या, “सभेच्या दिवशी रूममध्ये त्यांची भाषणाची तयारी सुरु असते. त्यामुळे आम्ही कोणीही त्यांच्या रूममध्ये जात नाही. त्यांच्या तयारीत व्यत्यय येऊ नये यासाठी आम्ही कोणालाही रूममध्ये पाठवत नाही.”
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”