-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका जाहीर केल्यानंतर आणि मशिदींवरील भोंग्यांविरोधात दंड थोपटल्यानंतर औरंगाबादमध्ये सभा घेतली. गुढीपाडव्यानंतर ही त्यांची तिसरी सभा आहे. (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
राज ठाकरे यांनी आपल्या औरंगाबादमधील सभेत शरद पवार यांच्या नास्तिकतेपासून महाराष्ट्राचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी आमि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्द्यांचा हा आढावा. (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
१. अल्लाउद्दीन खिलजीने १ लाख लोकं येतो म्हणून सांगितलं आणि प्रत्यक्षात काही हजार लोकच आले. ही महाराष्ट्रातील पहिली फेक न्यूज – राज ठाकरे (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
२. प्रबोधनकार ठाकरे धर्मातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणारी व्यक्ती होते. माझे आजोबा भटभिक्षुकांच्या विरोधात होते. त्यांचं लिखाण जातीपातीत भेद निर्माण करणारं नाही – राज ठाकरे (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
३. माझ्या आजोबांनी ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून हिंदू मिशनरी चळवळ स्थापन केली होती. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनीच सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू केला होता – राज ठाकरे (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
४. माझी पोलिसांना नम्र विनंती आहे जर हे सभेच्यावेळी बांग सुरू करणार असतील तर आपण आत्ताच्या आत्ता ताबोडतोब तोंडात बोळा कोंबावा. सरळसरळ मार्गाने समजत नसेल, तर मग त्यानंतर काय होईल मला माहिती नाही. एकदा काय ते होऊनच जाऊ दे – राज ठाकरे (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
५. सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे. ते भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजे, पण मशिदींवरील भोंगे उतरल्यानंतर मंदिरांवरील भोंगे उतरवले जातील – राज ठाकरे (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
६. रामदास स्वामींकडे तुम्ही आता जातीने बघणार आहात का? रामदास स्वामी कधी बोलले होते का की ते शिवाजी महाराजांचे गुरू आहेत म्हणून. शिवाजी महाराज कधी बोलले का की रामदास स्वामी माझे गुरू आहेत? गुरू-शिष्याच्या नात्याचा काही संबंधच येत नाही – राज ठाकरे (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
७. शरद पवारांना हिंदू या शब्दाची मुळात अॅलर्जी आहे. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहेच पण त्याआधी महाराष्ट्र आमच्या शिवछत्रपतींचा आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले आहेत. पण शरद पवारांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी ऐकले नाही – राज ठाकरे (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
८. शरद पवार साहेब मी जात मानत नाही. कोणत्या ब्राम्हणांची बाजू घेण्यासाठी मी उभा नाही आणि कोणाचीच बाजू घेणार नाही – राज ठाकरे (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
९. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत त्याने दुही माजत आहे – राज ठाकरे (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)
-
१०. अठरापगड जातींमध्ये तुम्ही विष कालवले. मतांसाठी कालवलेले विष शाळा कॉलेजपर्यंत गेले आहे. शाळेत मुले एकमेकांच्या जातीविषयी विचार करु लागली आहेत. यासाठी महाराष्ट्र दिवस साजरा करायचा का? – राज ठाकरे (छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी