-
शिवसेना खासदार संजय राऊत यांची गुरुवारी पुण्यात सभा झाली.
-
या सभेत राऊतांनी राज ठाकरे आणि भाजपावर जोरदार टीका केली.
-
मराठी माणसाजवळ मर्सिडीज असायला हव्यात. परंतु त्या कष्टाच्या असाव्यात, चोरीच्या नसाव्यात, असं राऊत म्हणाले.
-
यावेळी भाषणाच्या सुरुवातीला जमलेल्या तमाम मराठी बंधू भगिनी म्हणायचे की हिंदू बंधू भगिनी म्हणायचे असा प्रश्न पडतो, कारण आपण दोन्ही आहोत, असं राऊत म्हणाले.
-
तसेच आपल्या खांद्यावर शिवाजी महाराजांचा बाळासाहेबांनी दिलेला भगवा आहे, असंही राऊत म्हणाले.
-
बाळासाहेबांचं स्मरण केल्याशिवय दिवस उजाडत नाही, त्यांनी महाराष्ट्र घडवला,शिवसेना उभी केली स्वाभिमान दिला.
-
आज लोक पेटवा-पेटवीची भाषा करतात, कोणी करायची पेटवा-पेटवीची भाषा, आमचं अख्ख आयुष्य पेटवा-पेटवीत गेलं, असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
-
दारुगोळा शिवसेनेकडे आहे, पेटवायची भाषा करणारे अंड्या पांड्या पोलीस येताच पळून गेले, अशा शब्दांत त्यांनी मनसेची खिल्ली उडवली.
-
तसेच ज्यांना १५ वर्षे भोंग्यांचा त्रास झाला नाही, त्यांना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर भोंग्यावर त्रास झाला, त्यांच्या पोटात दुखतंय, असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
-
दानवे म्हणतात, मला महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे, कशाला जातीपातीत भांडणे लावता, हा महाराष्ट्र बहुजनांचा आहे, या महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री बाळासाहेबांनी दिला. आता जात नाही, तर कर्तृत्व महत्वाचं आहे, असं राऊत रावसाहेब दानवेंना उत्तर देत म्हणाले.
-
या महाराष्ट्रात मुस्लिम मुख्यमंत्री होऊन गेले, बॅरिस्टर अंतुले बाळासाहेबांचे लाडके होते, असंही राऊत यांनी सांगितलं.
-
लाऊड स्पीकर बंद केल्याने हिंदू भाविक काकड आरतीला मुकलेत, यांनी आमचंच नुकसान केलं, असं म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला.
-
तसेच पंतप्रधान हल्ली औरंगजेबाच्या गोष्टी सांगतात, या औरंगजेबाला महाराष्ट्रानेच गाडला. या औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता, त्याचा मृत्यू महाराष्ट्रात झाला, अशी टीका त्यांनी नरेंद्र मोदींवर केली.
-
तुम्ही आमच्यात फूट पाडू नका, तुम्ही आम्हाला इतिहास सांगू नका, तुमचा इतिहास सुधारा, असंही ते म्हणाले.
-
दिल्लीतील भारतीय जनता पार्टीकडून शिवसेना संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे, सुपाऱ्या दिल्या जात आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
-
पुण्यातील शिवसैनिकांनी महापालिकेत किरीट सोमय्याला पायरी दाखवली, त्याबद्दल त्यांचं कौतुक, असं म्हणत राऊतांनी टोला लगावला.
-
योगी आदित्यनाथांचं कौतुक करताय, आमच्या महाराष्ट्रात प्रेतं वाहिली नाहीत, महाराष्ट्रात हे चित्र दिसलं नाही त्याच कारण उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व होतं. उद्धव ठाकरेंना बदनाम करता, त्यासाठी भाड्यानं माणसं घेताएक दिवस भाजपा महाराष्ट्रातून नामशेष होईल, असं राऊत म्हणाले.
-
(सर्व फोटो – संग्रहित आणि व्हिडीओतून स्क्रिनशॉटस्)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral