-
एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी औरंगाबादमधील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारीस पठाण यांची उपस्थिती होती. औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यावरून सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्रात एमआयएम नेत्यांवर टीकेची झोड सुरु आहे.
-
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही दिलेलं आव्हान असून आपण स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं हे विसरु नका असा इशारा दिला आहे.
-
“औरंगजेबाला आम्ही याच मातीत गाडलं होतं आणि औरंगजेबाचे जे भक्त आहेत जे राजकारण करु इच्छित आहेत त्यांचीही हीच स्थिती होईल. महाराष्ट्रातील माती मर्दांची, शुरांची आणि महाराजांची आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
-
“संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सर्वांना, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकत महाराष्ट्रात अशांतता निर्माण कऱण्याचं ओवेसी बंधूंचं राजकारण दिसत आहे. पण मी इतकंच सांगेन की औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत आम्ही टाकलं आहे. तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
-
“औरंगजेब काय महान संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केलं, मंदिरं उद्ध्वस्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर मराठा योद्ध्यांनी लढाई लढली आहे. पण आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणं हे आव्हान दिल्यासारखं आहे. आम्ही हे आव्हान स्वीकारतो,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
-
“औरंगजेबाला आम्ही याच मातीत गाडलं होतं आणि औरंगजेबाचे जे भक्त आहेत जे राजकारण करु इच्छित आहेत त्यांचीही हीच स्थिती होईल. महाराष्ट्रातील माती मर्दांची, शुरांची आणि महाराजांची आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
-
दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत जाहीर आव्हान दिलं आहे. “मी आव्हान करतो…पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा…याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
-
याआधी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “ओवेसीला माहित आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण राज्यामध्ये नामर्दांचे सरकार आहे. याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व,” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
-
“महाराष्ट्रातील हिंदूंना, शिवप्रेमींना नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न होता. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे लचके तोडले, आपल्या आई-वडिलांनाही सोडलं नाही, अत्याचार केले त्याच्या कबरीसमोर तुमच्या छातीवर उभं राहून नतमस्तक होतो आणि महाराष्ट्रातून दोन पायावर निघून जातो हा संदेश द्यायचा होता का? हा संदेश मिळाल्यानंतर ठाकरे सरकार ज्यांना हनुमान चालीसा चालत नाही, जय श्रीराम चालत नाही…लगेच देशद्रोहाचे गुन्हे टाकतात त्यांनी २४ तास उलटले असतानाही या प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केलेला नाही?,” अशी विचारणा नितेश राणे यांनी टीव्ही ९ शी बोलताना केली आहे.
-
“उद्धव ठाकरेंना जमत नसेल तर आम्ही आमदार, खासदार, भाजपा वैगेरे नंतर आहोत, आधी मराठा, शिवप्रेमी आहोत. जर संभाजीराजे, शिवरायांचा कोणी अपमान करत असेल तर फक्त १० मिनिटांसाठी अकबरुद्दीनला आमच्या हवाली करा. त्याला तिथेच रांगेत झोपवलं नाही तर महाराजांसमोर नतमस्तक होणार नाही,” असंही नितेश राणे म्हणाले.
-
“जो बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे त्याला हे पटलेलं नाही. ज्याचं रक्त भगवं आहे. ज्याच्या नसांमध्ये महाराज आहेत त्यांना झोप लागलेली नसणार. इतर वेळी पोलिसांच्या माध्यमातून हिंमत दाखवता ना…खरे मर्द असाल तर ओवेसीला त्याची जागा दाखवा. देशातील शिवप्रेमी चिडलेला आहे. उद्या कायदा सुव्यवस्था बिघडली तर आम्ही जबाबदार नाही. जर कोणी आम्हाला चिडवत असेल तर आम्हीदेखील सहन करणार नाही. जर कोणी आमच्या दैवतांचा अपमान करत असेल तर योग्य उत्तर द्यायला येतं,” असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.
-
“खरं म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन कोणीच घेत नाही. कारण, तो औरंगजेब इतका दृष्ट होता की त्याने सगळ्यांनाच त्रास दिलेला आहे. हिंदुंच्या देव-दैवतांची मंदिरं तोडली, जिझिया कर लावला. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसेत संत तुकाराम महाराजांची पालखी देखील अडवण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्म नष्ट करण्याचं त्याचे स्वप्न होते. तो अतिशय दुष्ट राजा होता, म्हणून मुस्लीम धर्मातील लोकांनी देखील त्यांच्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवलेलं नाही. तिथल्या अन्य दर्गावर लोक जातात, त्या दर्गा वेगळ्या आहेत परंतु औरंगजेबाच्या कबरीवर कोणीच जात नाही. पण आता हे एमआयएमचे लोक तिथे जाऊन आले, यातून नवीनच काहीतरी राजकारण करण्याचा त्यांचा उद्देश दिसतो. तो काही बरोबर नाही.” असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
-
“महाराष्ट्र सरकारला लोकांवर राजद्रोहाचा गुन्हा लावण्याचा भारी शौक आहे. एवढी जर तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा ना. तुमची किती हिंमत आहे, किती साहस तुमच्यामध्ये आहे हे महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या मावळ्यांना पाहायचंय. ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवण्यासाठी जातो? काय कारण?” असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
-
“ज्या औरंगजेबानं आयुष्यभर छत्रपती शिवरायांना छळण्याचा प्रयत्न केला, कैद केलं. संभाजीराजांचे डोळे फोडले, जीभ छाटली. त्यांना क्रूरपणे मारण्यात आलं. या देशात हिंदूंना राहायचं नाही, राहायचं असेल तर त्यांना जिझिया कर द्यावा लागेल असे जुलमी प्रकार ज्या औरंगजेबानं केले, देशाच्या मातीबरोबर खऱ्या अर्थानं गद्दारी केली. मंदिरं तोडली. अनेकांचा छळवाद मांडला. देशाच्या मातीशी गद्दारी केली, त्या औरंगजेबाच्या कबरीवर कुणी डोकं टेकवण्यासाठी जात असेल तर तो गद्दार नाहीये का? तो राजद्रोह नाहीये का? या सरकारमध्ये जर हिंमत असेल, तर आधी ओवैसींवर राजद्रोह लावावा”, अशा शब्दांत राम कदम यांनी राज्य सरकारला आव्हान दिलं आहे.
-
भाजपासहीतच सत्ताधारी शिवसेनेनंही ओवेसी यांच्यावर टीका केली असतानाच आता आमदार रवी राणा यांनी या प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजी राजेंच्या विचारांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रात संभाजी नगर येऊन ओवेसी फुलं वाहतात. माझ्या राजकीय जीवनामध्ये आतापर्यंत ती कबर कोणी उघडली, तिथं फुलं वाहिली हे मी फक्त उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पाहिलेलं आहे,” असं राणा म्हणालेत.
Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण