-
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातील राजकीय गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. (सर्व फोटो आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी केली.
-
याप्रकरणी भाजपाच्या संबंधित कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण नेमकं घडलं काय होतं हे अनेकांना माहिती नाही. या गॅलरीमध्ये फोटोंच्या माध्यमातून याच प्रकरणाच्या घटनाक्रमावर टाकलेली ही नजर…
-
इराणी यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ आणि ‘जय श्रीराम’ या घोषणा देण्यात आल्या.
-
त्याचवेळी बाल्कनीमधून ‘महात्मा गांधी की जय’ या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ व्यत्यय आला.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां वैशाली नगवडे यांच्यासह पाच महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
-
त्यावेळी या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली आहे.
-
सभागृहामधील भाजपा समर्थकांनी मारहाण केल्याचे आरोप केले जात असून यासंदर्भातील व्हिडीओही व्हायरल झालेत.
-
एकीकडे सभागृहामध्ये हा गोंधळ सुरु असताना दुसरीकडे रंगमंदिराच्या परिसरात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.
-
बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमापूर्वी स्मृती इराणी यांचा सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रम होता.
-
त्यापूर्वी महागाईच्या मुद्दयावर इराणी यांनी बोलावे, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
-
क्यू की गॅस भी कभी सस्ती थी असे फलक राष्ट्रवादीच्या महिलांनी हातात पकडले होते.
-
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून महागाईविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली जात होती.
-
इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला.
-
सभागृहात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात राष्ट्रवादीकडून सोमवारी डेक्कन पोलीस स्थानकामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती.
-
याच तक्रारीची दखल घेत डेक्कन पोलिसांनी भस्मराज तीकोने ( रा.कसबा पेठ ) , प्रमोद कोंढरे( रा. नातू बाग), मयूर गांधी (शुक्रवार पेठ,) या भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखला केला आहे.

