-
पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात वैष्णवी पाटील या डान्सरने चित्रपटातील एका लावणीवर आधारीत रिल्सचं शुटिंग केलं. (सर्व छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
लावणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
-
यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींकडून या रिल्सवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
-
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने या व्हिडीओवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली.
-
“जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केलं आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.
-
“ज्या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवलं, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणं हे निषेधार्ह आहे,” असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं होतं.
-
शिवप्रेमी संघटेनेने जोरदार आक्षेप घेतल्यानंतर या प्रकरणात अभिनेत्री वैष्णवी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
-
वैष्णवी पाटीलवर लाल महालामध्ये लावणी नृत्य करून त्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित करून भावना दुखावल्याचा आरोप आहे.
-
या प्रकरणी मराठी कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
याबाबत रखवालदार राकेश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.
-
यानंतर आता स्वतः डान्सर वैष्णवी पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत जाहीर माफी मागितली आहे.
-
या व्हिडीओत तिने माझ्याकडून लालमहालात लावणीचा व्हिडीओ शूट करून चूक झाली आहे. त्यासाठी मी सर्वांची माफी मागते, असं मत व्यक्त केलं आहे.
-
या वादानंतर हा वादग्रस्त व्हिडीओ रिल्स तयार करणारी डान्सर वैष्णवी पाटील कोण आहे याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.
-
वैष्णवी पाटील सेलेब्रिटी डान्सर आहे.
-
वैष्णवीने आतापर्यंत भारतातील अनेक प्रसिद्ध डान्सिंग शोजमध्ये सहभाग घेत स्पर्धा जिंकल्या आहेत.
-
यात डान्स इंडिया डान्स, झलक, ढोलकीच्या तालावर, बुगी वुगी, इंडियाज गॉट टॅलेंट, नचले वे, ईटीव्ही सुपरडान्सर या स्पर्धांचा समावेश आहे.
-
वैष्णवी पाटीलचा यूट्यूब चॅनल देखील आहे.
-
२०११ मध्ये सुरू केलेल्या तिच्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत ४९ लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.
-
डान्सिंगमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी वैष्णवी पाटील पुण्यातील लाल महालात लावणीचा रिल्स तयार करून अडचणीत आली आहे.
-
तिच्याविरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने जाहीर माफिनामा सादर केलाय.
-
वैष्णवी पाटीलचा लाल महालातील फोटो. या फोटवर सोशल मीडिया युजर्सने फोटो काढणं ठीक आहे पण लावणीचा व्हिडीओ शूट करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
-
वैष्णवी इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रीय आहे.
-
वैष्णवी सातत्याने आपले वेगवेगळ्या वेशभुषेतील फोटो शेअर करत असते.
-
तिच्या फोटोवर तिचे चाहते देखील प्रतिक्रियांचा पाऊस पाडतात.
-
वैष्णवी पाटीलचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झालेत.
-
फोटोंसोबतच वैष्णवी विविध गाण्यांवरील आपले डान्स व्हिडीओ देखील शेअर करत असते.
-
वैष्णवीच्या रिल्समध्ये तिचा फिटनेस आणि डान्समधील तिच्या भन्नाट स्टेप्स चाहत्यांचं मन जिंकून घेतात.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)
-
(छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ