-
देहूमधील शिळा मंदिर ४२ फूट उंचीचं असून मंदिरातील तुकोबांची मूर्ती ४२ इंचाची आहे. ही मूर्ती ४२ दिवसात साकारण्यात आली. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. हे शिळा मंदिर कसं आहे? अशी उत्सुकता अनेकांना लागली आहे. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
शिळा मंदिराची उंची ४२ फूट असून मंदिरातील जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची उंची ४२ इंच आहे. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
विशेष म्हणजे तुकोबांची मूर्ती देखील अवघ्या ४२ दिवसात घडवली आहे, अशी माहिती शाहीर अन शिल्पकार चेतन रवींद्र हिंगे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहूत येणार आहेत. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
मंदिरावर नक्षीकाम करण्यात आलं आहे, त्यात मोर, हत्ती यांचे कोरीव नक्षीकाम करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
हे नक्षीकाम सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
देहू संस्थानचे नितीन महाराज मोरे म्हणाले, “जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगगाथा तरल्या गेल्या, त्या कालावधीत तुकाराम महाराज १३ दिवस अन्न, पाणी सोडून अनुष्ठानसाठी बसले होते.” (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
“भगवंताच्या कृपेने अभंगगाथा दगडासह वर आल्या आणि तुकोबारायांनी अनुष्ठान सोडलं. परंतु, तुकोबारायांचे चरण स्पर्श झालेल, ज्या शिळेवर ते बसले होते. ती शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तुकोबांचे चिरंजीव तपोवन महाराज यांनी देहूच्या मंदिरात आणून ठेवली होती,” असं नितीन महाराज मोरे यांनी सांगितलं. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
भाविक, वारकरी दर्शन घेत होते. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा आग्रह होता. ते देहू संस्थान पूर्ण करत आहे याचा आनंद होतो आहे, अशीही भावना मोरे यांनी व्यक्त केली. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
२००८ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं होतं. प्रत्यक्षात २०१५-१६ साली शिळा मंदिराचं काम सुरू झालं. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
मंदिराची रचना हेमाडपंथी असून मूळ गर्भगृह १४×१४, अंतर गर्भगृह ९×९, उंची १७×१२, तर मंदिराची उंची ४२ फूट आहे, मंदिरातील तुकोबांच्या मूर्तीची उंची ४२ इंच आहे. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
राजस्थान येथील एका खाणीतील दगडापासून तुकोबारायांची मूर्ती घडवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
तुकोबांचं वय ४२ सांगण्यात आलं होतं. त्यामुळं त्याच वयातील तुकोबा साकारण्याचं मोठं आव्हान होतं. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
मात्र, अवघ्या ४२ दिवसात मूर्ती घडवण्यात आली. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
मूर्तीमध्ये विना, चिपळे, पगडी असं दाखवण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
तुकोबांची मूर्ती घडवण्याची मला संधी मिळाली. ही मागच्या जन्माची पुण्याई आहे, असं शिल्पकार चेतन रवींद्र हिंगे यांनी म्हटलं आहे. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
एकूणच भाविकांनी या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)
-
आगामी काळात भाविकांचा हा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य : प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”