-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.
-
अमित ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिकांनी रात्रीपासून गर्दी केली होती.
-
अमित ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या शिवतीर्थबाहेर शुभेच्छा देण्यासाठी रात्रीपासून मनसैनिक जमले होते.
-
रात्री कार्यकर्त्यांकडून लेझर शोच्या माध्यमातून अमित ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
-
शिवतीर्थाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून लेझर लाईट शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
अमित ठाकरे यांनी शिवतीर्थाबाहेर येत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
-
दरम्यान अमित ठाकरे यांना आजही भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
-
अमित ठाकरे यांनी यावेळी सर्वांची भेट घेत शुभेच्छांचा स्विकार केला.
-
दरम्यान यावेळी त्यांच्या केकने मात्र सर्वाचं लक्ष वेधलं.
-
मनसे पक्ष भोंग्याविरोधी आंदोलनामुळे चर्चेत असून अमित ठाकरेंच्या वाढदिवसालाही हा भोंगा पहायला मिळाला.
-
अमित ठाकरेंसाठी आणलेल्या केकवर भोंग्याचं चित्र होतं.
-
मनसेने मशिदींवरील भोंग्याला विरोध केला असून याविरोधात मोठं आंदोलनही करण्यात आलं. जोपर्यंत भोंगे पूर्णपणे काढले जात नाहीत तोवर हे आंदोलन सुरु राहणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.
-
अमित ठाकरेंच्या वाढदिवसाला त्यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरेदेखील उपस्थित होत्या.
-
२३ जानेवारी २०२० रोजी अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग करण्यात आलं. मुंबईतील सभेत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती.
-
अमित ठाकरे यांनी मुंबईतील डीजी रुपारेल कॉलेजमधून कॉमर्समधून पदवीचे शिक्षण घेतले आहे.
-
ते राजकारणात पूर्णपणे सक्रिय नव्हते तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या मांडत होते.
-
अमित यांनी मनसेच्या काही आंदोलनांमध्ये देखील सहभाग घेतला होता.
-
अमित देखील एक उत्तम चित्रकार आहेत हे फार कमी जणांना माहित आहे.
-
अमित ठाकरे यांनी आपल्या बालमैत्रिणीशी म्हणजेच मिताली बोरुडे हिच्याशी लग्न केलं असून नुकतेच वडील झाले आहेत.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”