-
सिंधुदुर्गतील मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटकांची बोट बुडाली आहे. या दुर्घटनेमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. (बोटीचा फोटो प्रातिनिधिक आहे)
-
या बोटीमध्ये एकूण २० पर्यटक होते. त्यापैकी १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून दोघांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
-
जय गजानन नावाची २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट येथे किनाऱ्यावर आणत असताना ती बुडून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर सात जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून, ११ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली.
-
आकाश भास्करराव देशमुख (वय ३० रा. शास्त्रीनगर अकोला), डॉ. स्वप्नील मारुती पिसे (वय ४१ आळेफाटा, पुणे) अशी दोन्ही मृतांची नावं आहेत. (बोटीचा फोटो प्रातिनिधिक आहे)
-
रश्मी निशेल कासुल (वय ४५ रा. ऐरोली, नवी मुंबई) यांच्यावर रेडकर हॉस्पीलट येथे तर संतोष यशवंतराव (वय ३८ बोरिवली, मुंबई), डॉ. अविनाश झांटये हॉस्पीटल येथे उपचार सुरु आहेत. रुग्णांना दाखल करण्यासाठी बचाव कार्यामधील कर्मचारी आणि स्थानिकांची एकच धावपळ सुरु असल्याचं दिसून आलं.
-
मृणाल मनिष यशवंतराव (वय ८), ग्रंथ मनिष यशवंतराव (वय दीड वर्ष), वियोम संतोष यशवंतवराव (वय- साडेचार वर्ष), सर्व रा. बोरिवली मुंबई. वैभव रामचंद्र सावंत(वय ४० रा. वायरी तारकर्ली), उदय भावे (वय ४० ऐरोली, नवी मुंबई ) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनेक पर्यटकांवर उपचार करताना कृत्रिम ऑक्सिजनची मदत घेण्यात आली.
-
शुभम गजानन कोरगावकर (वय २२) शुंभागी गजानन कोरगावकर, (वय २६ रा. दोघेही केरवडे , कुडाळ) लैलेश प्रदिप परब (वय ३०), अश्विनी लैलेश परब (वय ३० रा. दोघेही कुडाळ), मुग्धा मनिष यशवंतराव (वय ४०) मनिष यशवंतराव (वय ४०) आयुक्ती यशवंतराव (३१ रा. सर्व बोरिवली, मुंबई). सुशांत आण्णासो धुमाळे (वय ३२), गितांजली धुमाळे (वय २८रा. दोघेही जयसिंगपूर जि. कोल्हापूर). प्रियन संदिप राडे (वय १४ रा. प्रज्ञानंद नगर, पुणे), व सुप्रिया मारुती पिसे (वय ३१ रा. पुणे) यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.
-
या बोटीमध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. अपघानंतर रुग्णालयात उपचार घेताना लहान मुलांनाही श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना ऑक्सिजन मास्क पुरवण्यात आलेले,
-
नेमक्या कोणत्या कारणामुळे अचानक ही बोट बुडली यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नसली तर पर्यटनाच्या कालावधीमध्ये हा अपघात झाल्याने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्याप्रमाणामध्ये तारकर्लीला पर्यटक येतात. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी तारकर्ली हे हॉट फेव्हरेट डिस्टीनेशन ठरत आहे. मात्र आता या अपघातामुळे येथील पर्यटनाला धक्का पोहचू शकतो अशी चर्चा सुरु झालीय.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल