-
कर्नाटकातील काँग्रेस आमदाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
-
जमीर अहमद खान असं या आमदाराचं नाव आहे.
-
जमीर खान यांनी भेदाभेद संपवण्यासाठी आणि समाजात सुरु असलेला धर्मवाद, जातीवादाविरोधात आवाज उठवण्यासाठी केलेली कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
-
जमीर खान हे चामरपेटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकर जयंती आणि ईद मिलनच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
-
यावेळी जमीर खान यांनी चक्क एका दलित स्वामीच्या तोंडातील घास काढून खाल्ला.
-
आपल्या या कृतीतून जातीभेद, धर्मभेद मानत नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
-
जमीर खान यांनी यावेळी जातीवादाचा प्रसार करणाऱ्यांना, समाजात द्वेषाची भावना निर्माण करणाऱ्यांवर जोरदार टीका केली.
-
माणसा माणसात कोणताही भेद नसल्याचं सांगत त्यांनी समोरच्या ताटातून स्वामी नारायण यांना घास भरवला आणि स्वामींनाही आपल्याला घास भरवण्यास सांगितलं.
-
पण स्वामींनी ताटातील घास उचलण्यासाठी हात पुढे केला असता जमीर खान यांनी त्यांना रोखलं आणि स्वत:च्या तोंडातील घास काढून भरवण्यास सांगितलं.
-
मग स्वामींनीही आपल्या तोंडातून घास काढून जमीर यांना भरवला.
-
त्यावेळी उपस्थित सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला.
-
(Photos: Video Screengrab)

Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा