-
अमेरिका आणि चीनमध्ये तैवानच्या मुद्द्यावरुन सुरु असणारा वाद पुन्हा चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत.
-
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर तैवानचे संरक्षण करण्याचे ओझे ‘आणखी मोठे’ असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलंय. टोक्योमध्ये ते क्वाड परिषदेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
तसेच चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका लष्करी हस्तक्षेप करेल, असा इशारा बायडेन यांनी दिलाय.
-
तैवान सरकारच्या समर्थनार्थ अमेरिकेच्या कुठल्याही अध्यक्षाने गेल्या दशकभरात केलेले हे सर्वात जोरदार वक्तव्य होते.
-
चीनने आक्रमण केल्यास तैवानच्या संरक्षणासाठी लष्कर आणण्यास तुम्ही इच्छुक आहात काय, असा प्रश्न बायडेन यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता.
-
बायडेन यांनी या प्रश्नावर उत्तर देताना ‘होय’ असं सांगितलं. ‘आम्ही तसे वचन दिले आहे,’ असे ते म्हणाले.
-
तैवानशी कुठलाही संरक्षणविषयक करार नसलेला अमेरिका सहसा तैवानला अशा प्रकारची सुरक्षेची स्पष्ट हमी देणे टाळतो. मात्र आता अमेरिकेने चीनला थेट इशारा दिलाय.
-
चीनने आक्रमण केल्यास आपण कुठवर पाऊल पुढे टाकू याबाबत ‘व्यूहात्मक संदिग्धतेचे’ धोरण अमेरिकेने आजवर बाळगले आहे.
-
मागील बऱ्याच काळापासून तैनाव आणि चीनमध्ये संघर्ष सुरु आहे.
-
अशातच आता बायडेन यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये नवीन वादाची ठिणगी पडण्याची शक्यात आहे.
-
चीन हा तैवानला आपलाच भूभाग मानतो आणि अनेकदा चीनने अशापद्धतीचा दावा केला आहे.
-
त्यामुळे आता या वक्तव्यावर चीन अमेरिकेला काय उत्तर देतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. (फोटो सौजन्य : रॉयटर्सवरुन साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”