-
Anil Parab ED Raid: शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घऱी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले. ईडीने मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले असून तपास सुरु आहे. या कारवाईनंतर महाविकास आघाडीकडून केंद्र सरकारवर टीका केला जात असून तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यावरुन संताप व्यक्त केला आहे.
-
अनिल परब यांच्याशी संबंधित ज्या सात ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे ती सात ठिकाणं नेमकी कोणती आहेत हे जाणून घेऊयात.
-
१) अजिंक्यतारा – अनिल परबांचं मंत्रालयाजवळी शासकीय निवासस्थान
-
२) मोनार्क इमारत – अनिल परब यांचं वांद्रे पूर्वमधील खासगी निवासस्थान
-
३) अनिल परब यांच्याशी संबंधित चेंबूरच्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरी ईडीचे छापे
-
४) दापोलीमधील साई रिसॉर्ट
-
५) दापोलीमधील जमीन अनिल परब यांना विकणाऱ्या विभास साठेंच्या कोथरुडमधील घरी छापे
-
६) ६) विभास साठे यांच्या कोथरुडमधील कार्यालयात छापेमारी
-
७) अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरीदेखील छापेमारी
-
(All – File Photos)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”