-
भाजपाचे नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६५ वा वाढदिवस.
-
आपल्या कामाबरोबरच मनमिळवू स्वभावामुळे सर्वपक्षीय मित्रपरीवार असणाऱ्या नितीन गडकरींची भाषणं ही विषेश गाजतात.
-
सध्या केंद्रात मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातही युती सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवलेलं आहे.
-
राजकीय आरोप प्रत्यारोपांपेक्षा किस्से आणि मजेदार गंमतीजमती सांगत गडकरी अनेक कार्यक्रमांमध्ये लक्ष वेधून घेताना दिसतात.
-
‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या वेब-संवादात गडकरींनी एक किस्सा सांगितला होता.
-
हा किस्सा आहे ‘बिग बी’ अर्थात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल.
-
अमिताभ बच्चन यांनी गडकरींना एकदा फोन केला होता.
-
मात्र गडकरींनी ‘नाटक मत कर, रख नीचे फोन’ असे म्हणत बिग बींचा फोन कट केला होता.
-
सुरुवातीच्या काळात माझी आणि अमिताभ बच्चन यांची फारशी ओळख नव्हती. त्याच काळात एकदा अमिताभ यांनी मला फोन केला.
-
फोनवरील व्यक्तीने पलिकडून हॅलो, मैं अमिताभ बोल रहा हूँ असं सांगितलं. त्यावेळी मला कोणीतरी माझी मस्करी करत असल्यासारखे वाटले, असं गडकरींनी त्या फोन कॉलबद्दल बोलाताना सांगितले.
-
या फोन कॉलला आपण एकदम मजेदार उत्तर दिल्याचे सांगतानाच पुन्हा अमिताभ यांचा फोन आल्यानंतर आपण चुकल्याचे लक्षात आल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले.
-
कोणीतरी मस्करी करत असल्याचे समजून मी, नाटक मत कर चल फोन रख असं म्हणत फोन कट केला.
-
मात्र थोडा वेळात मला परत फोन आला आणि परत तोच आवाज ऐकू आला.
-
मी खरोखरच अमिताभ बच्चन बोलत असल्याचे पलिकडच्या व्यक्तीने अगदी गांभीर्याने सांगितल्यानंतर मला चूक लक्षात आली, अशी आठवण गडकरींनी या कार्यक्रमात सांगितली.
-
(सर्व फोटो सौजन्य : नितीन गडकरी / ट्विटर)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल