-
लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे तर्फे दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
-
बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वषार्चा शुभारंभ सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.
-
या सोहळ्याला रामनाथ कोविंद यांच्या पत्नी व भारताच्या प्रथम महिला सविता कोविंद, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार व्यासपीठावर उपस्थित होते.
-
श्री दत्तमंदिराच्या १२५ वर्षाच्या कायार्चा आढावा घेणाऱ्या लक्ष्मीदत्त या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले.
-
यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार २०२२ चे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले.
-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता काळे आणि उद्यानकृषी क्रांतीच्या जनक असलेल्या राईज अँड शाईन बायोटेक प्रा. लि.च्या चेअरमन व कार्यकारी संचालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पिंपरीच्या प्र-कुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.
-
दत्तमंदिर ट्रस्टचे खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अॅड. रजनी उकरंडे, उप उत्सवप्रमुख युवराज गाडवे, ज्येष्ठ विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, अक्षय हलवाई आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
-
महाराष्ट्रातील संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज आदींनी समाजाला नवी दिशा दिली. यामुळे भारतामध्ये नवीन चेतना जागृत झाली. दगडूशेठ दाम्पंत्याने पुण्यात गणपती व लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या माध्यमातून नवीन ऊर्जा दिली आहे, असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आंदोलन याच भूमीवर सुरू केले आणि मानवतेसाठी आदर्श निर्माण केला. महाराष्ट्राला ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे देशातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्र यापुढेही चांगले योगदान करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ