-
मराठी चित्रपट सिनेसृष्टीला वेगळी दिशा देणाऱ्या सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अचानक करमाळा शहरातील जुन्या मित्रांच्या भेटी घेतल्या.
-
नागराज मंजुळे यांनी करमाळ्यातील मित्र व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली.
-
यावेळी नागराज मंजुळे यांनी आपल्या जुन्या मित्रांबरोबर गप्पा मारल्या.
-
मित्रांसोबत बोलत असताना नागराज मंजुळे यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
-
त्यांनी यावेळी मित्रांसोबत कॅरमही खेळला.
-
नागराज मंजुळे यांचे मूळ गाव जेऊर आहे.
-
मात्र, करमाळा शहरातील किल्ला विभागात ते अनेक दिवस राहायला होते.
-
करमाळ्याच्या भेटीत नागराज मंजुळे यांनी मित्रांच्या कुटुंबीयांसोबतही फोटो काढले.
-
यावेळी त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप, पत्रकार संजय शिंदे, पिंटूशेट गुगळे, नागेश झांजुरणे, रमेश वीर, आबा शिंदे, सतीश काकडे, नितीन आढाव आदींच्या भेटी घेतल्या.

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी