-
कोल्हापूरसह जिल्ह्याला आज(गुरुवार) सायंकाळी आलेल्या पावसाने अक्षरशा झोडपून काढले.
-
सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव, जोरदार पाऊस यामुळे अवघे कोल्हापूर शहर काही काळातच जलमय झाले होते.
-
झाडे कोसळल्याने विजेचा व्यत्यय, जलकोंडी, वाहतूक अडथळा यासारख्या अडचणी उद्भवल्या.
-
यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
-
जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाचे आगमन होणार असल्याचे हवामान विभागाने कळवले होते.
-
कणान नगर मधे मार्शल हॉल जवळील भाले यांच्या घरावर चिंचेचे मोठे झाड पडल्याने. भाडेकरूंच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.
-
विजेच्या खांबावरील तारा तुटल्याने अनेक भागात अशी धोकादायक परिस्थिती उद्भवली होती.
-
सांगलीमध्येही पावासाने दमदार हजेरी लावली.
-
पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा देखील होता.
-
यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
-
पावसापासून बचाव करण्यासाठी फेरीवाल्याने मोठी छत्री पकडून थांबावे लागले.
-
विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…