-
नागपूर : पूर्व नागपुरातील वर्दळीचा भाग असलेल्या यशोधरा नगर परिसरातील एका अगरबत्तीच्या कारखान्याला शुक्रवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली.
-
या आगीत कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
-
मिळालेल्या माहितीनुसार यशोधरा नगरातील शितला मंदिराजवळ असलेल्या अगरबत्तीचा कारखाना आहे.
-
कारखान्याच्या आजूबाजूला निवासी वस्ती आहे.
-
शुक्रवारी सकाळी सुरुवातीला कारखान्याच्या मागच्या बाजूला आग लागली.
-
काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केले.
-
अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती मिळताच आगीवर नियमंत्रण मिळवण्यासाठी सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
-
विशेष म्हणजे सकाळी ११ वाजता कारखाना सुरू होत असल्यामुळे कारखान्यातील मजूर कामावर येत होते.
-
मात्र त्यापूर्वीच आघीची घटना घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक