-
भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त अमरावती-अकोला या राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच बिटूमिनस काँक्रीटच्या सर्वात लांब रस्त्याची अखंडपणे निर्मितीचा विश्वविक्रम नोंदविला जाणार आहे. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
आज सकाळी सात वाजल्यापासून या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम सलग ११० तासात ७५ किलोमीटरपर्यंत लोणी ते माना या गावापर्यंत हा विक्रम नोंदविला जाणार आहे. निसर्गाची साथ लाभून हा प्रयत्न यशस्वी झाल्यास त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होण्याची शक्यता आहे. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
अमरावती ते अकोला हा महामार्ग मागील दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून खराब स्थितीत होता. या मार्गाचे काम यापूर्वी तीन कंपन्यांना देण्यात आले होते, मात्र हे काम सतत रखडल्यामुळे या मार्गाऐवजी अमरावती ते अकोला प्रवास नागरिक दोन वर्षांपासून दर्यापूर मार्गे बनलेल्या उत्कृष्ट रस्त्यावरून करत होते. महाराष्ट्रातील अतिशय खराब रस्ता म्हणून ओळख असणारा अमरावती अकोला हा मार्ग आता विक्रमी नोंद करून उत्कृष्ट होतो आहे. (एक्स्पेस फोटो – धनंजय खेडकर)
-
४८०.७९ कि.मी. लांबीच्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची अमरावती ते चिखली (नांदुरा अगोदरचे गाव) १९४ कि.मी. आणि फागणे ते नवापूर १४०.७९ कि.मी. अशी कामाची विभागणी झाली. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
अमरावती ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली दरम्यान एकूण चार टप्प्यात काम सुरु झाले आहे. त्यापैकी अमरावती ते अकोला दरम्यान कामाची गती अतिशय मंदावली असल्याने, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हा मार्ग दहा वर्षांपासून रखडला आहे. यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विक्रमी वेगात या मार्गाच्या चारही टप्प्याचे काम हाती घेतले आहे. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
अगोदर ‘एल अॅण्ड टी’ कंपनीने जमीन अधिग्रहणासह विविध कारणावरून काम सुरू करण्यापूर्वीच सोडून दिले. त्यानंतर २०१५ मध्ये अमरावती ते चिखलीपर्यंतचे २२८८.१८ कोटी रुपयांचे कंत्राट ‘आयएल अॅण्ड एफएस’ अंतर्गत असलेल्या ‘आयटीएनएल’ कंपनीकडे होते. ‘आयएल अॅण्ड एफएस’ आर्थिक डबघाईस आल्याने काम बंद पडले. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
‘बीओटी’वर काम करणे अडचणीचे झाल्याने ‘हायब्रीड अॅन्युटी’ तत्त्वावर हे काम करण्याचा निर्णय झाला आहे. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
२०२१ मध्ये नव्याने निविदा प्रक्रिया राबवून चार टप्प्यातील काम तीन कंत्राटदार कंपन्यांना देण्यात आले आहे. सध्या हे काम प्रगतिपथावर आहे. पहिल्या दोन टप्प्यातील १०४ कि.मी.च्या रस्त्यांच्या कामाची सरासरी कमी आहे. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
या कामाला गती येण्याच्या दृष्टीने ३ जूनला सकाळी ६ वाजतापासून ते ७ जूनच्या दुपारपर्यंत ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या सर्वात लांब अखंड रस्त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
पहिल्या टप्प्यातील ५४ कि.मी. लांबीमध्ये एका बाजूच्या दोन लेनमधील ७५ कि.मी.च्या रस्त्याचे काँक्रिटीकरण चार दिवसांत करण्याचे प्रयत्न आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होईल, असा दावा कंत्राटदार कंपनीकडून करण्यात आला. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
संबंधित कंत्राटदार कंपनीने यापूर्वी सांगली-सातारा दरम्यान २४ तासांत विक्रमी रस्त्याची निर्मिती केली होती. आता लोणी-मूर्तीजापूर दरम्यान विक्रम रचण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी ७२८ मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
या विश्वविक्रमी प्रयत्नाची अंमलबजावणी करण्यासाठी राजपूत इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सूक्ष्म नियोजन केले आहे. तसेच प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक महामार्ग अभियंता, क्वालिटी इंजिनियर सर्वेअर, सेफ्टी इंजिनियर यांच्यासह एकूण आठशे कर्मचारी या कामासाठी झटत आहेत. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
“सलग चार दिवस काम करून ७५ कि.मी.चा महामार्ग निर्मिती करण्याच्या दृष्टीने नियोजन केल्याचे संबंधित कंत्राटदार कंपनीने कळविले आहे. काम दर्जेदार होईल, याकडे आमचे लक्ष राहील. या प्रयत्नांना निसर्गाची साथ मिळणे देखील आवश्यक राहणार आहे,” अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक व महाव्यवस्थापक विलास ब्राह्मणकर यांनी दिली. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड