-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हिलियन इमारत, अद्यावत सिंथेटिक ट्रॅक व इनडोअर हॉलचं उद्घाटन केलं.
-
यावेळी अजित पवार यांनी क्रीडा संकुलातील रायफल शुटिंग विभागात स्वतः शुटिंग केली. तसेच त्या विभागाची अधिकाऱ्यांकडून माहिती देखील घेतली.
-
विशेष म्हणजे अजित पवार यांनी एकाग्र होऊन अधिकाऱ्यांच्या सूचना ऐकल्या आणि शुटिंग केली.
-
उदय सामंत यांनी देखील रायफल शुटिंगचा आनंद घेतला.
-
यावेळी अजित पवार यांनी लेझर रायफलची माहिती घेत ही रायफल देखील चालवून पाहिली.
-
एकूणच अजित पवार यांनी विद्यापीठातील या क्रीडा संकुलाची पाहणी करत सखोल माहिती घेतली.
-
तसेच ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या.
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अजित पवार यांनी फुटबॉल खेळण्याचाही आनंद घेतला.
-
अजित पवार यांनी फुटबॉलला किक मारत खेळण्याचा प्रयत्न केला. तसेच खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. (सर्व फोटो सौजन्य – सागर कासार/ लोकसत्ता प्रतिनिधी)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”