-
ऑपरेशन ब्लू स्टार हे १ ते ८ जून १९८४ दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्णमंदीरात घडलेल्या चकमकीचे नाव आहे.
-
मृतसरमधील सुवर्णमंदीरात शीख अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवली होती व हे मंदीर दहशतवाद्यांचे प्रमुख तळ बनले होते.
-
तत्कालिन पंजाबमधील राजकीय घडामोडी, त्यातुन फुटीरतावाद्यांना वाढत जाणारा पाठिंबा, खलिस्तानची मागणी व या सर्वांना मिळणारा शीख धार्मिक पाठिंबा यासर्वांचे रुपांतर पंजाबमधील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक हिंसाचारात झाले व परिस्थिती बिघडण्यात कारणीभूत ठरले.
-
खेरीस ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला व भारतीय सैन्यास कारवाईचे आदेश दिले. जर्नेल सिंह भिंद्रनवाले सह बरेच दहशतवादी यात मारले गेले, इतरांनी शरणागती पत्करली.
-
पण सुवर्णमंदीरात त्यावेळी बरेच नागरिकही उपस्थित होते. त्यांचाही यात मृत्यु झाला. याचमुळे शिखांचे सर्वोच्य धार्मिक स्थळ सुवर्णमंदीरातील ही कारवाई वादग्रस्त ठरली. यात सुवर्णमंदिराचेही मोठे नुकसान झाले.
-
हिंसाचाराची मालिका येथेच न संपता याचीच परिणिती पुढे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांकडुन झालेली हत्या व त्यानंतर उसळलेल्या शीख विरोधी दंग्यांत झाले.
-
इंदिरा गांधींच्या हत्येने भारतात शीखविरोधी दंगली भडकल्या, ज्या दरम्यान सुमारे ३००० शीख लोक मारले गेले.
-
दंगली काँग्रेस पक्षाने भडकावल्या होत्या, ज्यांनी जमावाला शीख पुरुष आणि महिलांची कत्तल करण्यास उद्युक्त केले असल्याचा आरोप केला होता.
-
शीख समुदायाच्या मालकीची दुकाने आणि घरे उद्ध्वस्त करण्यात आली होती. तसेच अनेक शीख लोकांना जिवंत जाळले गेल्याचे घटनाही घडल्या होत्या.
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं