-
साताऱ्याजवळ महादरेच्या वनक्षेत्राला मुंबईत झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘फुलपाखरू संवर्धन राखीव’ म्हणून मान्यता मिळाली.
-
केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील हे पहिलं फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र ठरले आहे.
-
या जंगलात बिबट्यापासून फुलपाखरांपर्यंत वन्यजीवांचा मुक्त विहार, निखळ पाण्याचे निर्झर, पाठीशी यवतेश्वरचा डोंगर, हिरवीगार जंगल झाडी, कोणालाही मोहित करावे असं महादरेचं जंगल आहे.
-
सातारा शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर हे जंगल आहे.
-
महादरे येथील जैवविविधता अलौकिक आहे.
-
पश्चिम घाटात 341 प्रजातींची फुलपाखरे आढळतात.
-
त्यापैकी 178 प्रजाती एकट्या महादरेच्या जंगलात पाहायला मिळतात.
-
यवतेश्वर घाटाच्या मध्यापासून भैरोबा टेकडीपर्यंत सुमारे 105 हेक्टर वनक्षेत्रावर वनविभागाची मालकी आहे.
-
तेवढ्याच क्षेत्राला संवर्धित राखीव क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या कोणत्याही हक्काला बाधा नाही.
-
उलट या क्षेत्राचे संरक्षण, संगोपन आणि नैसर्गिक विकासासाठी मनुष्यबळ व आर्थिक तरतूद शासन करेल, असे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी स्पष्ट केले.
-
किर्रर्रर्र जंगलात, पक्षांच्या किलबिलाटात, निसरड्या पायवाटा तुडवत जंगलभ्रमंती अनुभवण्याची संधी निसर्गपर्यटकांना या निमित्ताने चालून आली आहे.
-
त्याचबरोबर स्थानिकांना गावातच रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य