-
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची ४३ मते मिळाली आहेत. पटेल विजयी होणार याची खात्री कार्यकर्त्यांना होती. त्यामुळे निकालाअगोदरच कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली होती.
-
भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे याच्या कपाळीही विजयाचा गुलाल लागला. बोंडे यांना ४८ मते मिळाली आहेत.
-
खरी लढत ही भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात झाली. महाडिक यांनी अनपेक्षितरित्या संजय पवार यांचा पराभव करुन विजय मिळवला. संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर महाडिक यांना ४१ मते मिळाली आहेत.
-
काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांना पहिल्या पसंतीची ४४ मते मिळाली आहेत. इम्रान प्रतापगडी हे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आहेत. मात्र, त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले होते.
-
भाजपचे उमेदवार पियुष गोयलही राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. गोयल यांना ४८ मते मिळाली आहे.
-
शिवसेना नेते संजय राऊत यांचा राज्यसभा निवडणुकीत विजय झाला आहे. राऊत यांना ४१ मते मिळाली आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणार असा दावा संजय राऊत यांनी केला होता. मात्र, निकालानंतर हा दावा फोल ठरल्याचे सिद्ध झाले.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”