-
शिवसेना नेते व राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे 15 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. (फोटो क्रेडिट – दीपक जोशी)
-
या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून मागील अनेक दिवसांपासून तयारी केली जात होती.
-
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अयोध्याचा दौरा केला होता.
-
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी संजय राऊत अयोध्येला गेले होते.
-
त्यानंतर आता १५ जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असून सायंकाळी ५.३० वाजता ते श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत.
-
आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक उत्तर प्रदेशकडे निघाले आहेत
-
सोमवारी ठाण्याहून काही शिवसैनिक अयोध्याला रेल्वेने रवाना झाले.
-
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 वर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते.
-
यावेळी शिवसैनिकांनी घोषणा दिल्या.
-
यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी वरूण सरदेसाई, खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
-
आदित्य ठाकरे १५ जून रोजी सकाळी ११ वाजता लखनऊ विमानतळावर उतरतील. त्यानंतर दुपारी १.३० वाजता ते अयोध्येमध्ये जातील.
-
येथे दुपारी ३.३० वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी