-
आज संपूर्ण राज्यभरात शाळा सुरु झाल्या आहेत. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)
-
पुणे शहरातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)
-
पहिला दिवस असल्याने शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयारी केली होती. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)
-
शाळा मिकी माऊस, छोटा भीम अशा कार्टूनच्या प्रतिकृती आणि विविधरंगी सजावटीने सजलेली होती. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)
-
आई-बाबा शाळेत सोडून गेल्याने अनेक मुलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांना सांभाळताना शिक्षकांना कसरत करावी लागत होती. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)
-
मुलांना समजावताना शिक्षकांची, ताईंची चांगलीच तारांबळ उडत होती. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)
-
अनेक विद्यार्थी शाळेचा पहिला दिवस असल्याने आनंदात होते. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)
-
करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शैक्षणिक वर्ष सुरू करावे लागले होते. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)
-
मात्र यंदा करोना प्रादुर्भाव कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू झाल्या. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)
-
शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार शाळांनी पूर्वतयारी करून विद्यार्थ्यांचे उत्साहात शाळांमध्ये स्वागत केले. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)
-
विद्यार्थ्यांना फूल, शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)
-
विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला आलेले पालक आणि रिक्षा, स्कूलव्हॅन यामुळे शहराच्या विविध उपनगरांमध्ये काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. (एक्स्पेस फोटो – आशिष काळे)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही