-
काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधीची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
-
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९३८ साली ‘नॅशनल हेराल्ड’ हे वृत्तपत्र सुरु केलं होतं.
-
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या कंपनीतर्फे लखनौच्या कैसरबाग येथील हेराल्ड हाऊस नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुख्यालयातून ‘नॅशनल हेराल्ड’ हे दैनिक प्रसिद्ध होत असे.
-
१९४२-४५ दरम्यान ब्रिटीशांकडून या वृत्तपत्रावर बंदी घालण्यात आली होती.
-
त्यानंतर हे दैनिक पुन्हा प्रकाशित होऊ लागलं. परंतु, आर्थिक अडचणींमुळे २००८ मध्ये काँग्रेसला आपलं मुखपत्र बंद करावं लागलं होतं.
-
२०१६ साली ‘नॅशनल हेराल्ड’ डिजिटलच्या माध्यमातून पुन्हा प्रकाशित होऊ लागलं.
-
‘नॅशनल हेराल्ड’ संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले होते.
-
संस्थेची मालमत्ता हडपण्यासाठी सोनिया गांधी आणि राहुल यांनी ‘यंग इंडिया लिमिटेड’ या कंपनीमार्फत घोटाळा केला, असा आरोप आहे.
-
दोन हजार कोटींच्या मालमत्तेचा सौदा ५० लाखांमध्ये करण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे.
-
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणामुळे राहुल गांधीच्या संपत्तीविषयी समाजमाध्यमांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
-
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी १५ कोटी ८८ लाखांपेक्षाही अधिक संपत्तीचे मालक आहेत.
-
२०१४ साली राहुल गांधींकडे ९.४कोटींची संपत्ती होती.
-
२०१९ मध्ये मालमत्तेत वाढ होऊन १५ कोटी संपत्तीचे राहुल गांधी मालक झाले.
-
राहुल गांधींनी ७२ लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे.
-
एकूण संपत्तीमधील ५ कोटी १९ लाख रुपये त्यांनी शेअर मार्केट आणि म्युचुअल फंडमध्ये गुंतवले असल्याची माहिती आहे.
-
राहुल गांधींकडे ३३३.३ ग्रॅम सोनेदेखील आहे.
-
राहुल गांधींचे वार्षिक उत्पन्न कोटींच्या घरात आहे.
-
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, २०१७-१८मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न १ कोटी ११ लाख रुपये होते.
-
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी १३ जूनपासून राहूल गांधीची ईडीकडून चौकशी होत आहे.
-
तर सोनिया गांधी तब्येतीच्या कारणास्तव त्या चौकशीला हजर राहू शकल्या नाहीत.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स