-
शिवसेना नेते व महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत.
-
अयोध्येत पोहोचल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सर्वप्रथम इस्कॉन मंदिराला भेट दिली.
-
तेथे त्यांनी राधाकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन केले.
-
त्यानंतर राम मंदिर आणि हनुमानगढीमध्ये पूजा करून दर्शन घेतले.
-
शरयू नदीच्या काठी आरती करून दर्शन घेतले.
-
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेचे अनेक नेते अयोध्येत पोहोचले होते.
-
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत आधीच अयोध्येत हजर झाले होते.
-
अयोध्येत पत्रकारपरिषद घेत आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
-
“ही आमची तीर्थयात्रा आहे राजकीय यात्रा नाही. इथे राजकारण करायला नाही, दर्शन घ्यायला आलो आहे.”, असे सांगितले.
-
तसेच, अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी जागा मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
-
(सर्व फोटो : आदित्य ठाकरे/ इन्स्टाग्राम)

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!