-
विदर्भ ही वाघांची भूमी आणि या वाघांच्या दर्शनासाठी परदेशातून पर्यटक येत असले तरीही वाघोबा मात्र देवदर्शनानंतरच पर्यटकांना दर्शन देतात.
-
रामदेगी परिसरात फिरणारा ” मटका” यातलाच एक.
-
“मटकासुर” चा बछडा असलेला “मटका” सध्या पर्यटकांना सहज दर्शन देत आहे.
-
कधी तो रामदेगी मंदिराच्या पायऱ्या चढताना, तर कधी मंदिरातून दर्शन घेऊन उतरताना दिसतो. (फोटो सौजन्य – मकरंद परदेशी)
-
आधी थोडासा आक्रमक असलेला “मटका” हल्ली बराच शांत झाला आहे.
-
आठवड्यातून एकदा तरी तो मंदिरात येतोच.
-
पण आजतागायत त्याने कधी कुणाला दुखापत केली नाही आणि म्हणूनच तो पर्यटकांचा देखील लाडका झाला आहे.
-
त्याची ही भटकंती पर्यटक इंद्रा ठाकरे यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपली आहे.
-

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य