-
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैभवी पालखी सोहळ्यासोबत पंढरीच्या वाटेवर पायी चालून सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला जाण्यासाठी वैष्णवजण अतुर झाले आहेत. (सर्व फोटो – राजेश स्टीफन)
-
संतांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सध्या हजारो वारकऱ्यांची पावले आळंदी-देहू नगरीकडे वळत आहेत.
-
दोन वर्षांच्या खंडानंतर प्रथमच वारी आणि पालखीचा सोहळा रंगणार असल्याने वारकऱ्यांमध्ये त्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
-
संत तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून २० जूनला होणार आहे. त्यानंतर २१ जूनला माऊलींची पालखी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
-
करोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांमध्ये पायी वारी आणि पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता.
-
सलग दोन वर्षे संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला एसटी बसने पंढरपूरला नेण्यात आल्या.
-
पादुका नेण्यापूर्वी आळंदी आणि देहू येथे प्रस्थान सोहळा झाला, मात्र त्याला ठरावीकच वारकऱ्यांची उपस्थिती होती.
-
यंदा मात्र प्रस्थान, पालखी सोहळा आणि पंढरीची पायी वारी लाखो वैष्णवांच्या साक्षीने होणार आहे.
-
खांद्यावर भागवत धर्माची पताका आणि डोईवर तुळशी वृंदावन घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाकऱ्यांच्या दिंड्या सध्या आळंदी आणि देहूच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.
-
टाळ-मृदंगाचा गजर आणि मुखाने हरिभक्तीचा अखंड घोषही होतो आहे.

Kunal Kamra: “त्याच्या आयुष्याची कॉमेडी करा, केतकी चितळेही…” कुणाल कामरा प्रकरणावर भाजपा नेत्याचा आक्रमक पवित्रा