-
सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे.
-
माणिक वनमोरे (डॉक्टर) आणि पोपट वनमोरे (शिक्षक) या दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.
-
मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे.
-
डॉक्टर दाम्पत्याचा घरात सहा तर दुसऱ्या घऱात तीन तीन मृतदेह आढळून आले.
-
कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
-
आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वन (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे.
-
म्हैसाळ येथील नरवाड रोडजवळ असलेल्या अंबिकानगर चौकालगत असणाऱ्या मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहत होतो. अंबिकानगरमध्येच कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर येथे दुसरे घर आहे.
-
सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचे दरवाजे उघडले नव्हते.
-
शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचं उघज झालं. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह आढळले.
-
जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
-
दरम्यान या या घटनेमुळे मिरज तालुका हादरून गेला आहे. म्हैसाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
-
पोलीस आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी उपस्थित आहे. ही घटना कशामुळे घडली याचा तपास चालू आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
-
या आत्महत्येमुळे अनेकांना दिल्लीमधील बुराडी प्रकरणाची आठवण झाली आहे. दिल्लीमधील बुराडी येथे १ जुलै २०१८ रोजी एकाच कुटुंबातील ११ जणांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येमुळे संपूर्ण देश हादरला होता. नेटफ्लिक्सने ‘हाऊस ऑफ सिक्रेट’मधून या घटनेसंबंधी उलगडा केला आहे.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य