-
आता देशातील दिग्गज उद्योगपतींनीही अग्निपथ योजनेच्या समर्थनार्थ उभे राहण्यास सुरुवात केली आहे. आनंद महिंद्रा यांनी चार वर्षे देशसेवा केल्यानंतर येणाऱ्या अग्निवीरांना महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरी देण्याची घोषणा केली. अग्निवीरांना त्यांच्या कंपनीत कोणती पदे दिली जातील हेसुद्धा आनंद महिंद्रा यांनी स्पष्ट केले आहे.
-
महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर होत असलेल्या हिंसाचारामुळे मी अत्यंत दु:खी आणि निराश झालो आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला जात होता, तेव्हा मी म्हणालो होतो की अग्निवीरला मिळणारी शिस्त आणि कौशल्य त्याला नक्कीच रोजगारक्षम बनवेल. त्यांनी पुढे लिहिले की, महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित आणि सक्षम तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल.
-
आनंद महिंद्रा यांनी अग्निवीरांना नोकरी देण्याबाबत ट्विट करताच युजर्सनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. असाच प्रश्न संदीप कुमार नावाच्या युजरने विचारला होता. संदीपने विचारले- अग्निवीरांना महिंद्रा ग्रुपमध्ये कोणत्या पदावर नोकरी दिली जाईल?
-
यावर उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, ‘कॉर्पोरेट क्षेत्रात अग्निवीरांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत. नेतृत्व क्षमता, टीमवर्क आणि शारीरिक पराक्रमाने सुसज्ज तरुण लोक आमच्या उद्योगाला पुढे नेण्यासाठी काम करतील.
-
हे युवक आम्हाला इंडस्ट्री सोल्यूशन्स प्रदान करतील, ऑपरेशन्सपासून मॅनेजमेंट आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटपर्यंतच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतील.
-
‘अग्निपथ भरती योजने’अंतर्गत तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. भरतीसाठी वयोमर्यादा १७ वर्षे वरून २१ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
-
चार वर्षांच्या अखेरीस ७५ टक्के सैनिकांना कर्तव्यातून मुक्त करण्यात येणार आहे. इच्छूक जवानांपैकी जास्तीत जास्त २५ टक्के जवानांना यापुढेही सैन्यात सेवा करण्याची संधी मिळेल.
-
नव्या नियमानुसार भरती झालेल्या तरुणांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतात. १०वी उत्तीर्ण जवानांनाही सेवा कालावधीत १२वी करण्यात येणार आहे.
-
लष्कराने तिन्ही सेवांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. १ जुलैपासून त्यांची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे लष्कराने म्हटले आहे. हवाई दलाची भरती प्रक्रिया २४ जूनपासून तर नौदलाची भरती प्रक्रिया २५ जूनपासून सुरू होणार आहे.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”