-
विधान परिषद निवडणुकीतील निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड पुकारण्याची शक्यता असल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे. यामुळे शिवसेनेकडून बैठकांचं सत्र सुरु असून एकनाथ शिंदे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून निवडणुकीतील यशाचा आनंद साजरा केला जात आहे. यामुळे राज्यात एकाच दिवशी दोन वेगळी चित्रं पहायला मिळत आहेत. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
भारतीय जनता पक्षाने नागपूरमध्ये शहर भाजपातर्फे टिळक पुतळ्यासमोरील पक्षाच्या कार्यालयासमोर ढोल ताशांच्या निनादात आणि फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
भाजपा कार्यकर्त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन पेढे वाटले व जल्लोष केला. महिलाना कार्यकर्त्यांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठय़ा प्रमाणावर फुटल्याने पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली आणि पक्षाचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले, तर भाई जगताप यांचा विजय झाला. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
भाजपाचे १०६ आमदार आणि आठ अपक्षांचा पाठिंबा असताना राज्यसभेत पक्षाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. विधान परिषदेत पक्षाला १३४ मते मिळाली आहेत. उमा खापरे यांचे एक मत बाद झाल्याने अधिकृतपणे १३३ मते मिळाली. याचाच अर्थ राज्यसभेपेक्षा विधान परिषदेत भाजपला ११ मते अधिक मिळाली आहेत. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
शिवसेना व काँग्रेसची मते फोडण्यात भाजपाला यश आले आहे. गुप्त मतदान पद्धतीत काँग्रेस आणि शिवसेनेतील अस्वस्थ किंवा नाराज आमदारांना गळाला लावण्यात भाजपाला यश आले. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
महाविकास आघाडीतील प्रचंड नाराजी, असंतोष उघड झाला असून, त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. ही परिवर्तनाची नांदी आह़े राज्यात लोकाभिमुख सरकार सत्तेवर येईपर्यंत भाजपचा संघर्ष सुरूच राहील अशी प्रतिक्रिया विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)
-
दुसरीकडे ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मात्र पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शिवसैनिकांमुळे नेहमी गजबजणारी असणाऱ्या ठिकाणीही शुकशुकाट पहायला मिळत आहे.
![Jasprit Bumrah Ruled Out of Champions Trophy 2025 Due to Lower Back Injury](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Jasprit-Bumrah-Ruled-out-of-Champions-Trophy.jpg?w=300&h=200&crop=1)
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा