-
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात कथित बंड पुकारल्यानंतर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन बडतर्फ केलं आहे.
-
एकनाथ शिदेंनी कथित बंड पुकारल्यानंतर शिवसेनेनं घेतला हा सर्वात मोठा निर्णय आहे.
-
अजय चौधरी यांच्याकडे शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
-
विधानसभेमधील पक्षाचा गटनेता हा विधानसभेच्या पटलावर पक्षाच्या प्रतिनिधिंकडून कोणते विषय मांडायचे, कोणाला बोलण्याची संधी द्यायची, पक्षाची भूमिका काय आहे हे निश्चित करणे यासारखी महत्वाची जबाबदारी पार पाडतो.
-
एकनाथ शिंदे यांच्याकडे २०१९ पासून हे पद होतं.
-
गटनेता हा विधानसभेमधील आमदारांचा कामकाजादरम्यानचा मुख्य दुवा आणि नेता असतो.
-
मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी या पदावरुन एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
आता एकनाथ शिदेंऐवजी ही जबाबदारी शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
-
शिवडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
-
अजय चौधरी हे शिवसेना विभाग प्रमुख होते.
-
२००९ चा अपवाद वगळता ८० च्या दशकापासून या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे.
-
२०१४ विधानसभा निवडणुकीत अजय चौधरी विजयी झाले.
-
२०१९ साली शिवसेनेने शिवडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी दिली होती.
-
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजय चौधरी ४० हजार मताधिक्क्याने विजयी झाले.
-
शिवडीमध्ये सर्वच्या सर्व नगरसेवक शिवसेनेचे आहेत.
-
शाखाप्रमुखापासून ते गटप्रमुखापर्यंत शिवसेनेचे नेटवर्क भक्कम आहे.
-
लालबाग-परळच्या जनतेने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अजय चौधरी / ट्विटर)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…