-
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निकालानंतर स्वपक्षाविरोधात कथित बंडाचं हत्यार उपसल्यानंतर पहिल्यांदाच पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केलीय.
-
शिंदे सध्या सध्या गुजरातमधील सुरत येथील एका हॉटेलमध्ये आहेत.
-
शिदेंची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सुरतमध्ये पोहोचले आहेत.
-
दोन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून जवळपास २० मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली आहे.
-
यावेळी नार्वेकर यांच्या फोनवरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात देखील संवाद झाल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.
-
मी आतापर्यंत पक्षाविरोधी कोणतंही पाऊल उचललं नाही, त्यामुळे मला गटनेते पदावरून का काढण्यात आलं? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारल्याचं देखील समजत आहे.
-
यावेळी शिंदे यांनी संजय राऊत यांच्यासंदर्भातील नाराजी देखील नाराजी व्यक्त केल्याची माहिती टीव्ही ९ मराठीने दिली आहे.
-
संजय राऊत प्रत्यक्षात एक आणि माध्यमांत दुसरं बोलत असल्याचा आरोप शिंदेंनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना केला आहे.
-
त्याचप्रमाणे आपण कोणत्याही कागदावर सही केलेली नाही असंही शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.
-
२४ तासांमध्ये मी तुमच्यासाठी वाईट झालो का?, असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
-
मी कुठल्याही पक्षासोबत हातमिळवणी केलेली नाही, असं शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना कळवलं.
-
मला मुख्यमंत्री पदाची कोणतीही लालसा नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपात युती व्हावी, यात गैर काय आहे?, असा प्रश्नही शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.
-
मी अद्याप कुठलीही पक्षविरोधी कारवाई केली नाही. कोणताही वेगळा गट स्थापन केला नाही. कोणत्याही पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं नाही. तरीही माझ्यावर कारवाई का झाली?, असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी विचारलाय.
-
मी पक्षविरोधी काहीही केलंलं नसताना मला गटनेते पदावरुन का काढून टाकण्यात आलं?, असंही शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलं.
-
मला मंत्रीपद नको पण भाजपासोबत आपण पुन्हा सत्ता स्थापन केली पाहिजे असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
-
तसेच माझ्याविरोधात वातारवण निर्मिती का केली जातेय? माझ्याविरोधात घोषणा का दिल्या गेल्या? माझे पुतळे का जाळले गेले? असे प्रश्नही शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना विचारल्याचं एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.
-
आपण पक्षाच्या हिताचाच विचार करत आहोत, असंही यावेळी शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
-
यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
-
तुम्ही मुंबईत या, आपण समोरासमोर चर्चा करू, चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेऊ, सर्वकाही सुरळीत होईल, तुम्ही चिंता करू नका, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली.
-
आपण समोरासमोर बसून चर्चा करु असंही उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना म्हणाले.
-
त्यावर एकनाथ शिंदेंनी आपण पुन्हा एकदा भाजपासोबत जायला पाहिजे. तशी काळाची गरज आहे, असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
-
यात पक्षाचं हित आहे. ही आमदारांची भावना आहे. यात माझं काहीही हित नाहीय, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
-
मागील बऱ्याच काळापासून आमदार याबद्दल चर्चा करत होते. मात्र आज आपल्याला त्याला मुहूर्त द्यावा लागेल. अन्यथा मी पुढे माझे निर्णय घ्यायला सक्षम आहे, असंही एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं एबीपीने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.
-
यावर उद्धव ठाकरेंनी असा कोणताही निर्णय तुम्हाला स्वत:हून घेण्याची गरज नसल्याचं शिंदेंना सांगितलं.
-
आपण एकत्र बसून निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी शिंदेंची समजूत घालताना सांगितलं.
-
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही एकनाथ शिंदेंसोबत फोनवरुन चर्चा केल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिलीय.
-
तुम्ही परत या, आपण सर्वजण मिळून यावर बोलू आणि निर्णय घेऊ असं रश्मी ठाकरेनी शिंदे यांना सांगितल्याचं वृत्तवाहिन्यांनी म्हटलंय. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य एकनाथ शिंदेंच्या फेसबुक अकाऊंटवरुन साभार)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…