-
भाजपाकडून राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. दौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. त्या मुळच्या ओडिसा राज्यातील रहिवासी आहेत.
-
द्रौपदी मुर्मू या पेशाने शिक्षिका आहेत. १९९७ साली त्यांनी जिल्हा परिषदेपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. भाजपाच्या एसटी मोर्चाच्या त्या प्रदेशाध्यक्ष होत्या.
-
राजकारणात प्रवेश केल्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ओडिसा विधानसभेतून त्या दोन वेळा(२००० आणि २००९) आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी द्रौपदी या एक आहेत. प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपण्याच्या वेळीसुद्धा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी द्रौपदी यांचं नाव चर्चेत होतं.
-
२०१५ ते २०२१ या कालावधीत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. द्रोपदी यांच्या रुपाने झारखंडला पहिल्या राज्यपाल मिळाल्या.
-
त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्री म्हणूनही काम केलं आहे.
-
त्या राष्ट्रपती झाल्या तर या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला तर दुसऱ्या महिला राष्ट्रपती होतील.
-
(सर्व फोटो : ANI, इंडियन एक्सप्रेस)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य