-
शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आहे.
-
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबद्दल मुख्यमंत्री किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अनभिज्ञ होते, अशी चर्चा सुरू झाली असली तरी ठाकरे यांना गेल्या सहा महिन्यांपासून शिंदे यांच्या हालचालींची चाहूल लागली होती.
-
यातूनच ठाकरे यांनी शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता शिंदे यांनी ‘तसा काही विचार नाही’, असे उत्तर दिले होते अशी माहिती सूत्राने दिली.
-
शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांना सुरतला बरोबर घेऊन गेले तरीही मुख्यमंत्री किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याची पुसटशी कल्पना आली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येते.
-
मोठ्या संख्येने आमदार वेगळी भूमिका घेतात पण शिवसेनेच्या नेतृत्वाला त्याची काहीच कल्पना आली नाही याबद्दलही शिवसेनेच्या नेत्यांना दोष दिला जात आहे.
-
परंतु शिंदे यांच्या वेगळ्या भूमिकेची शिवसेनेला आधीच कुणकुण लागली होती, असे समजते.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या नोव्हेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.
-
तेव्हा रुग्णालयात असतानाच ठाकरे यांना शिंदे यांच्या या कटाचा सुगावा लागला होता.
-
रुग्णालयातून घरी परतल्यावर ठाकरे यांनी शिंदे यांना निवासस्थानी बोलावून घेतले होते.
-
तेव्हा ठाकरे यांनी शिंदे यांच्याकडे वेगळ्या भूमिकेबद्दल विचारणा केली होती.
-
तेव्हा शिंदे अडखळले व त्यांनी तसा काही विचार नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.
-
गेल्या डिसेंबरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय पथकातील एकाने किती आमदार फुटू शकतात याचा अंदाज घेतला होता.
-
यातील काही आमदारांबरोबर त्या व्यक्तीने संपर्कही केला होता.
-
शिंदे हे भाजपा नेत्यांच्या संपर्कात होते, असेही कळते.
-
महाविकास आघाडी सरकारमधील बड्या साऱ्याच नेत्यांवर आरोप केले जात होते.
-
अनिल देशमुख व नवाब मलिक यांना अटक झाली.
-
अजित पवार, अनिल परब, हसन मुश्रीफ आदी नेत्यांच्या विरोधात किरीट सोमय्या हे दररोज आरोप करीत होते.
-
पण एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे शक्तिमान नेते असतानाही सोमय्या यांनी एकदाही त्यांच्या विरोधात आरोप केला नव्हता.
-
ही बाब शिवसेना नेतृत्वाच्या निदर्शनास आली होती.
-
भाजपा शिंदे यांच्याबाबत मौन बाळगत आहे किंवा सौम्य भूमिका घेत असल्याचेही लक्षात आले होते.
-
विधानसभेत विरोधक शिंदे यांना लक्ष्य करीत नसत.
-
यामुळेच शिवसेना नेत्यांना शिंदे यांच्या एकूणच भूमिकेबद्दल अंदाज आला होता, असेही सूत्राने सांगितले.
-
वेगळा विचार नाही या शिंदे यांच्या स्पष्टीकरणावर शिवसेना नेत्यांनी विश्वास ठेवला होता.
-
पण शिंदे यांनी पक्षाला व नेतृत्वाला धोका दिला असेही सेनेच्या गोटातून सांगण्यात आले.
-
(सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ