-
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक शिवसेना आमदारांसह बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे.
-
शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा वाढत आहे.
-
या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि पक्ष प्रमुख पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.
-
तसेच वर्षा हा मुख्यमंत्री निवास सोडून मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला.
-
एकनाथ शिंदे गटाकडून भाजपाला समर्थनाचं पत्र देण्यात येणार असल्याच्याही चर्चा आहेत.
-
शिंदे यांच्या बंडानंतर गुरुवारी आणखी काही शिवसेना आमदार गुवाहाटीला गेले आहेत.
-
गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिंदेंसोबत ३७ शिवसेना आमदार व ९ अपक्ष आमदार आहेत.
-
एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने दिलेल्या माहिती नुसार रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये ७० रुमचे बुकींग करण्यात आले आहे.
-
सात दिवसांसाठी रुमचे बुकींग करण्यात आले आहे.
-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलचे सात दिवसांचे भाडे ५६ लाख रुपये आहे.
-
रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये एका दिवसाचे जेवण आणि इतर सुविधांसाठी तब्बल ८ लाख रुपये मोजावे लागतात.
-
राज्यातील सत्ता संघर्षावर चर्चेमधून तोडगा निघू शकतो अशी थेट ऑफर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना दिली आहे.
-
बंडखोरी करून गुवाहाटीत गेलेल्या शिवसेना आमदारांना २४ तासात ते परत मुंबईत आल्यास महाविकासआघाडीमधून बाहेर पडू, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे वर्णन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ अशा शब्दांत केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)
![Mesh To Meen Zodiac signs Daily Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Mesh-To-Meen-Zodiac-signs-Daily-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?