-
जोराच्या भुकंपाच्या धक्क्यामुळे अफगाणिस्तान हादरले आहे. या भुकंपात १ हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १५०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
-
भुकंपानंतर अफगाणिस्तानमधील घरे पत्त्यासारखी कोसळली. एका सेकंदात होत्याचं नव्हतं झाले.
-
बख्तर या सरकारी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या फोटोमध्ये, पूर्व अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात झालेल्या भूकंपात जखमींना बाहेर काढताना अफगाण लोक दिसत आहेत.
-
अफगाणिस्तानातील पक्तिका प्रांतात, एका व्हिडिओमधून घेतलेल्या या स्क्रीन ग्रॅबमध्ये लोक भूकंपानंतर जखमींना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात घेऊन जात आहेत. बख्तर न्यूज एजन्सी/हँडआउट रॉयटर्स द्वारे
-
पक्तिका प्रांत: बख्तर या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या फोटोमध्ये, भुकंपानंतर अफगाणिस्तानमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो घरे निस्नाभूत झाली आहेत.
-
बख्तर स्टेट न्यूज एजन्सीच्या व्हिडिओवरून घेतलेली ही प्रतिमा, तालिबानी सैनिक जखमी लोकांना हॅलिकॉपटरच्या माधयमातून सुरक्षित स्थळी हलवत आहेत.
-
पक्तिका प्रांतात, भूकंपानंतर जखमी लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाताना.
-
अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानलाही या भुकंपाचा धक्का बसला आहे.
-
अफगाणिस्तानच्या भूकंपग्रस्त भागांसाठी तंबू, ब्लँकेट आणि आपत्कालीन औषधांसह मदत सामग्री घेऊन जाणारा ट्रकचा ताफा. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हा फोटो जारी केला आहे.

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO