-
शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे.
-
शिंदेंनी आपल्या पक्षाची साथ सोडण्यास कारणीभूत असलेल्या अनेक घटकांमध्ये खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंचाही समावेश आहे.
-
खासदारपुत्र श्रीकांत शिंदे यांचे राजकीय भवितव्य सुरक्षित करणे हा शिंदेंच्या बंडामागील एक प्रमुख घटक असल्याचे मानले जात आहे.
-
श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदूत्ववादी मतदारांचा पगडा आहे.
-
या मतदारसंघामध्ये शिंदेंच्या मुलाला भाजपाच्या मदतीशिवाय विजय अशक्य आहे.
-
त्यामुळेच खासदारपुत्राचे राजकीय भवितव्य हाही एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत निर्णायक मुद्दा ठरल्याचे मानले जात आहे.
-
श्रीकांत शिंदे हे २०१४ पासून सक्रीय राजकारणामध्ये आहेत.
-
लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला.
-
शिवसेनेचा हा लोकसभा मतदारसंघ राखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपले पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना मैदानात उतरवले.
-
मुलाच्या प्रचारासाठी शिंदेंनी २०१४ मध्ये पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.
-
त्याचा परिणाम निकालामध्ये दिसून आला आणि श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगामध्ये आपल्या पहिल्याच प्रयत्नात खासदार झाले.
-
श्रीकांत शिंदेंनी अडीच लाख मतांनी विजय मिळवला.
-
त्यानंतर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही श्रीकांत शिंदेंनी विजय मिळवला.
-
यावेळेस त्यांनी ३ लाख ४४ हजार मतांनी विजय मिळवला.
-
३५ वर्षीय श्रीकांत शिंदे हे सर्वात तरुण खासदारांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
-
या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीच्या उमेदवारास चांगली लढतही देता आलेली नाही.
-
कल्याण डोंबिवली ते अंबरनाथ, उल्हासनगर या पट्टय़ात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हिंदूत्वाचा प्रभाव आहे.
-
कल्याण-डोंबिवली तर संघाचा बालेकिल्ला मानला जातो.
-
अशा हिंदूत्ववादी विचारांचा पगडा असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या मदतीशिवाय श्रीकांत शिंदे यांचा विजय शक्य नाही.
-
आतापर्यंत दोन वेळा खासदार झालेले श्रीकांत शिंदे हे भाजपाबरोबर जाऊन तिसऱ्या वेळीही खासदार होतील.
-
पुढच्या निवडणुकीत खासदार झाल्यावर त्या वेळीही देशात भाजपा सरकारच सत्तेवर येईल आणि त्या वेळी श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी मिळेल.
-
कदाचित त्याआधीच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यताही नाकारता येणार नाही, असे समीकरण मांडण्यात आले आहे.
-
त्यामुळे ठाणे-कल्याण या आपल्या प्रभावाखालील भागात हिंदूत्ववादी मतदारांचे गणिताचा पूर्ण विचार शिंदेंनी बंड करताना केल्याचे समजते.
-
खासदारपुत्राच्या राजकीय भवितव्याचाही विचार शिंदे यांनी शिवसेनेत बंड करताना केल्याचे समजते.
-
कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण व मुंब्रा कळवा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
-
यातील मुंब्रा-कळवा हा जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ आहे.
-
मागील काही काळापासून श्रीकांत शिंदे आणि आव्हाड यांचे मतभेद उघडपणे समोर आले आहेत.
-
खास करुन कळवा, मुंब्रा मतदारसंघामध्ये शिंदे आणि आव्हाड असा संघर्ष दिसून आलाय.
-
या संघर्षाची चर्चा अगदी महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांपर्यंतही गेल्याचं समोर आलंय.
-
मुंब्रा-कळवा मतदारसंघ सोडला तर बाकी सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये हिंदूत्ववादी मतदारांचा प्रभाव आहे.
-
त्यामुळेच चार मतदारसंघांत भाजपा-शिवसेनेचे आमदार आहेत.
-
तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील हे आमदार असले तरी ते शिवसेनेच्या उमेदवाराला अगदी थोडक्या मतांनी पराभूत करून निवडून आले.
-
शिवाय मनसेही पूर्वीपासून हिंदूत्वाशी जवळीक ठेवणारा असाच राहिला आहे. आता तर मनसेनेही हिंदूत्ववादी भूमिका घेतली आहे.
-
श्रीकांत शिंदे हे आक्रामक तरुण खासदार म्हणून ओळखले जातात.
-
लोकल ट्रेनसंदर्भातील प्रश्न त्यांनी अनेकदा लोकसभेमध्ये उपस्थित केले आहेत.
-
एकनाथ शिंदेंनीही महाविकास आघाडीत असतानासुद्धा संघाशी असलेलं नातं जपलं.
-
त्यामुळेच शिंदेंच्या या बंडाच्या निर्णयामागे हिंदूत्वाच्या मुद्दासोबत मुलाचं राजकीय भविष्य हा मुद्दाही महत्वाचा असल्याचं सांगितलं जातंय.
-
दरम्यान, बुधवारपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन दाखल होणाऱ्या शिवसेना व अपक्ष आमदारांची संख्या वाढू लागली. मंगळवारी शिवसेनेसोबत असलेले आमदार हळूहळू गुवाहाटीला जाऊ लागले.
-
मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बुधवारी रात्री सोडल्यानंतर तोवर शिवसेनेसोबत असलेले आणखी पाच आमदार गुरुवारी दिवसभरात गुवाहाटीला जाऊन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले.
-
याच पार्श्वभूमीवर शिवसेना विधिमंडळ पक्षात कायदेशीर फूट पाडण्यासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश आमदारांचे म्हणजेच पक्षाच्या ५५ पैकी ३७ आमदारांचे संख्याबळ एकनाथ शिंदे यांच्यापाशी झाले आहेत.
-
शिवाय शिवसेनेचे ९ सहयोगी अपक्ष आमदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने बंडातील आमदारांची एकूण संख्या ४६ झाली. (सर्व फाइल फोटो)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…