-
शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली असून, महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबतचा तिढा कायम आहे.
-
१६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
-
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
-
केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या वतीने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून रोगरहित लिंबुवर्गीय रोपटे तयार करणे, या विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते.
-
शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.
-
भाजपा पडद्याआडून बंडखोरांच्या मदतीने सरकार स्थापनेचे प्रयत्न करीत आहे.
-
या पार्श्वभूमीवर गडकरी यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
-
गडकरी स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात.
-
त्यांनी अनेकवेळा अप्रत्यक्षरित्या भाजपाच्या अलीकडच्या राजकारणावर मत व्यक्त केले आहे.
-
यावेळी त्यांनी लिंबुवर्गीय फळांबाबत बोलताना राजकारणातील ‘शॉर्ट कट’बाबत भाष्य केले.
-
गडकरी म्हणाले, हे युग गुणवत्तेचे आहे.
-
राजकारण असो किंवा व्यापार-व्यवसाय, त्याला पर्याय नाही.
-
जे लोक ‘शॉर्ट कट’चा अवलंब करतात. त्यांना भविष्य नाही.
-
लोकांना एक-दोन वेळा मूर्ख बनवले जाऊ शकते, परंतु ते वारंवार शक्य नाही.
-
जेव्हा लोकांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव होते, तेव्हा ते अशांना दारात उभेदेखील करीत नाही.
-
महाराष्ट्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर गडकरी यांनी अप्रत्यक्षरित्या टिप्पणी केली.
-
त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य