-
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा काल (२९ जुलै) राजीनामा दिला. जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
-
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आलं. शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष ९ आमदार शिंदे गटात असल्यामुळे ठाकरे सरकार अखेर कोसळलं.
-
२०१९च्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तापेचात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि मुख्यमंत्री पदाची धुरा उद्धव ठाकरेंकडे आली.
-
उद्धव ठाकरेंच्या रुपाने शिवसेनेला तिसरा तर ठाकरे घराण्याला पहिला मुख्यमंत्री मिळाला.
-
उद्धव ठाकरे हे अतिशय संयमी, मितभाषी, आणि मृदू स्वभावाचे राजकारणी आहेत.
-
राजकारणात त्यांना फारसा रस नव्हता. राजकारणात येण्याआधी एक छायाचित्रकार आणि लेखक म्हणून काम करायचे.
-
राजकारणात त्यांनी कधीच सक्रीय सहभाग नोंदवला नाही पण सामना वृत्तपत्राच्या संपादनाच्या माध्यमातून ते अप्रत्यक्षरित्या राजकारणाच्या सानिध्यात होते.
-
११९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीतून उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरीत्या राजकारणात पाय ठेवला.
-
त्यानंतरच्या २००२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंवर सोपवली.
-
२००३ साली बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे कार्याध्यक्ष पद सोपवले.
-
बाळासाहेबांनंतर शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरेंनी सांभाळली.
-
२००६ साली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे ते संपादक झाले.
-
२०१९मध्ये झालेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेना-भाजपा युती तुटली. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.
-
२८ नोव्हेंबर २०१९ रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
-
ते महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री होते. त्यांच्या निमित्ताने संयमी, मितभाषी पण तितकाच आक्रमक मुख्यमंत्री राज्याला मिळाला.
-
त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी जनतेला आणि प्रशासनाला विश्वासात घेऊन काम केले.
-
सरकार अल्पमतात आल्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. (सर्व फोटो : उद्धव ठाकरे/ फेसबुक)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ